Take a fresh look at your lifestyle.

दीपिका झाली ट्रोल….लोक म्हणाले-“ओवरएक्टिंग…” पहा व्हिडीओ

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । ‘कोरोनाव्हायरसची दहशत आता संपूर्ण देशभरात पसरत आहे, त्याचवेळी सेलेब्सदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला जागरूक करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. नुकतीच अभिनेत्री दीपिका पादुकोण नेही तिच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका तोंडावर मास्क लावून बाथरूममध्ये साबणाने आपले हात स्वच्छ करताना दिसली आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणने ट्विटरवर # सेफहॅन्ड्स चॅलेंज या हॅशटॅग दरम्यान हा व्हिडिओ शेअर केला आहे, या चॅलेंजसाठी अभिनेत्रीने क्रिस्टियानो रोनाल्डो, रॉजर फेडरर आणि विराट कोहली यांना देखील नॉमिनेट केले आहे.

 

मात्र, दीपिकाला आता तिच्या या व्हिडिओद्वारे ट्रॉलर्सच्या निशाण्यावर आली आहे. दीपिका पादुकोणच्या या व्हिडिओवर लोक सतत कमेंट करत आहेत आणि बाथरूममध्ये मास्क घालण्यावरून तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एका व्यक्तीने दीपिकाच्या या व्हिडिओवर भाष्य करत लिहिले की, “तुम्ही घरी मास्क का घालता?” तर तिथेच एका व्यक्तीने लिहिले, “ओवरएक्टिंग”.मात्र, याबद्दल दीपिकाने अद्यापही ट्विटरवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की कोरोनाव्हायरसच्या पुष्टी झालेल्या प्रकरणांची संख्या १४७ झाली आहे. ज्यामध्ये आतापर्यंत तीन लोकांचा बळी गेला आहे. नुकतीच अभिनेत्री दीपिका पादुकोण ‘छपाक’ चित्रपटात दिसली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमल दाखवू शकला नाही. या चित्रपटाविषयी अभिनेत्रीला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले.

 

Comments are closed.

%d bloggers like this: