Take a fresh look at your lifestyle.

दीपिकाने वडिलांसाठी केले ट्विट म्हणाली,”तुमचा अभिमान आहे…”

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । दीपिका पादुकोणने वडील प्रकाश पादुकोण यांच्याविषयी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिचे वडील आणि भारताचे प्रसिद्ध माजी बॅन्डमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांचे आभार मानले आहे. यासोबतच दीपिकाने त्यांचे कष्ट आणि समर्पणाचबद्दलचे संकेत दिले आहेत. दीपिका पदुकोण यांचे हे ट्विट खूप वाचले जात आहे आणि त्यात आपल्या वडिलांवरील मुलीचे प्रेमदेखील बघायला मिळते.

 

दीपिका पादुकोण यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘पप्पा,बॅडमिंटन आणि भारतीय खेळांमध्ये तुमचे योगदान अविश्वसनीय आहे. आपल्या समर्पण, शिस्त, वचनबद्धतेसाठी आणि वर्षांच्या कठोर परिश्रमांबद्दल खूप आभार… आम्ही तुमच्यावर प्रेम करतो आणि आम्हाला तुमचा अभिमान आहे.दीपिकाने त्यांना एका लेखात टॅग केले आहे.

जर आपण दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिचा शेवटचा चित्रपट ‘छपाक’ होता. ज्यामध्ये ती अ‍ॅसिड हल्ल्यातुन बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालची भुमीका साकारली होती. दीपिका पादुकोणचे यासाठी खूप कौतुक झाले.प्रकाश पादुकोण हे भारताचे सर्वोत्कृष्ट बॅडमिंटनपटू आहे.