Take a fresh look at your lifestyle.

तू लाज सोडलीस का? दीपिका पदुकोण पुन्हा होतीये ट्रोल. ‘हा’ व्हीडिओ व्हायरल !

सोशल कट्टा । ‘छपाक’ बॉक्स ऑफिसवर शेवटचे श्वास घेत असला तरी दीपिकाचे आपल्या बाजूने प्रोमोशन चे प्रयत्न चालूच आहेत. सोशल मीडिया त्यांना यासाठी खूप मदत करत असला त्याचेच कधी कधी उलटे फासे पडतात. त्याच मुले ती पुन्हा एका वादाच्या भोवऱ्यात अडकणार असे दिसतेय.

      अभिनेत्री दीपिका पदुकोणने छपाकमध्ये लक्ष्मी अगरवाल या ऍसिड व्हिक्टीमची मुख्य भूमिका साकारली आहे. ‘छपाक’मधील दीपिकाचा अभिनय पाहिल्यानंतर अनेकांनी तिचं कौतुकदेखील केलं. मात्र आता तेच चाहते तिच्यावर नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामागचं कारणही तसंच आहे. सध्या सोशल मीडियावर दीपिकाचा छपाकचं प्रमोशन करणारा टिक टॉक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. परंतु ज्या पद्धतीने तो व्हिडीओ शूट केला आहे त्यावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

     ‘छपाक’चं प्रमोशन करण्यासाठी दीपिका आणि टिक टॉक स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फाबीने एक व्हिडीओ तयार केला. या व्हिडीओमध्ये दीपिकाने फाबीला तिच्या आवडीच्या तीन चित्रपटांमधील लूक्स रिक्रिएट करण्याचं चॅलेंज दिलं. यामध्ये ‘ओम शांती ओम’, ‘पीकू’ आणि ‘छपाक’ या चित्रपटांमध्ये दीपिकाने जो लूक केला होता तो फाबीला रिक्रिएट करायचा होता. मात्र हे चॅलेंज नेटकऱ्यांना फारसं पटलं नाही. यात छपाकमधील लूक रिक्रिएट करण्यास सांगितल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

This Is My Favorite Look (1)

     अनेकांनी तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत तिला ट्रोल केलं आहे. दीपिकाने केलेला ‘हा व्हिडीओ अत्यंत लाजीरवाणा आहे’, असं काहींनी म्हटलं आहे. तर ‘निदान दीपिकाने तरी असं करायलं नको होतं’, असं काहींचं मत आहे.

      इतकंच नाही तर ‘हा सारा पब्लिकस्टंट असून अत्यंत वाईट आहे’, असं म्हटलं आहे. ‘एखाद्या ऍसिड हल्ला झालेल्या व्यक्तीविषयी टिक टॉक चॅलेंज देणं चुकीचं आहे. तुला लाज वाटली पाहिजे’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिच्यावर ताशेरे ओढले आहेत.

 

Comments are closed.

%d bloggers like this: