Take a fresh look at your lifestyle.

दीपिकाचे #दोबारा पूछो अभियान सुरु; हॅशटॅग ट्रेंडींगला

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी सापडला होता. त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले होते. त्याच्या मृत्यूनंतर मानसिक आरोग्यासंदर्भात अनेक मुद्दे समोर येत आहेत. अनेकांनी मानसिक आरोग्यासंदर्भात बोलायला सुरुवात केली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणने देखील मानसिक आरोग्याशी संबंधित एक मोहीम सुरु केली आहे. तिने तिच्या सोशल मीडियावरून दोबारा पूछो या हॅशटॅगने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

दीपिकाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये विविध व्यक्ती दाखविले आहेत. जे काहीतरी समस्येत आहेत. त्यांना एकदा विचारले असता ते काही नाही असे म्हणतात. पुन्हा विचारल्यावर पुन्हा असेच काहीसे उत्तर देतात. पण सतत विचारणा केल्यावर ते बोलायला तयार होतात. या व्हिडिओतून एखाद्या व्यक्तीने एकदा विचारल्यावर नकार दिला तर तिला पुन्हा विचारा असे ती म्हणू पाहते आहे. तिच्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

 

सुशांतच्या जाण्याने सध्या मानसिक आरोग्य हा चर्चेचा विषय झाला आहे. सध्या विविध माध्यमातून यावर बोलले जात आहे. लोक संचारबंदीच्या काळात निराशेच्या गर्तेत अडकू नयेत काही ठिकाणी ऑनलाईन समुपदेशनही सुरु करण्यात आले आहे.

 

Comments are closed.

%d bloggers like this: