Take a fresh look at your lifestyle.

सनी लिओनी चा नंबर मागितल्याचा दावा खोटा,कबीर बेदी:’हे तर बदनामीकारक’

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । अलीकडेच माध्यमांमध्ये बातमीनुसार ७४ वर्षीय अभिनेत्याने सनी लिओनीला डब्बू रत्नानी यांच्या पार्टीमध्ये त्यांचा नंबर मागितला होता.यामध्ये असेही म्हटले आहे की सनी लिओनीने त्याऐवजी  आपला पती डॅनियल वेबरचा नंबर दिला होता.पार्टीमध्ये खरोखर काय घडले हे स्पष्ट करून कबीर बेदी यांनी अफवा आहेत असे म्हंटले. सोशल मीडियावर डॅनियल वेबरनेही या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त करत या ज्येष्ठ अभिनेत्याचा बचाव केला.कबीर बेदी म्हणतात, “मी तिच्या नवऱ्याला त्याचा नंबर मागितला.”

डब्बू रत्नानीच्या कॅलेंडर लाँचिंगवेळी ही घटना घडली जिथे हा अभिनेता सनी लिओनकडे तिचा नंबर घेण्यासाठी आला होता.पण प्रत्यक्षात या अभिनेत्याला तिच्या पतीचा नंबर हवा होता. या अफवांबद्दल बोलताना कबीर बेदी यांनी ट्विटरवर एक ट्विट केले. आपल्या या ट्विटमध्ये ते लिहितात, “मी तिच्या नंबरसाठी सनीला विचारले होते ते खरं नाही.हे बदनामीकारक आहे.” ज्यांनी यासंदर्भात लेख लिहिला त्यांना तो काढून टाकण्यास सांगितले.

यावर डॅनियल वेबरने प्रतिक्रिया दिली

दुसर्‍या ट्वीटमध्ये डॅनियल वेबरनेही या घटनेबद्दल लिहिले आहे कि,हा अभिनेता आपला नंबर विचारू शकत नाही का ?.ते पुढे म्हणाले की, बेदी आणि लिओनी यांनी एकत्र काम केले आहे ते एकमेकांना ओळखत आहे.

कबीर बेदी यांनी हा एक लाजिरवाणा प्रकार आहे असे म्हणत वेबरचा प्रतिसाद पुन्हा ट्विट केला.

 

सनी लिओनीने अजूनही या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.