‘देवी’ रिव्ह्यू : महिला अत्याचाराचं भीषण वास्तव करेल तुम्हाला खिन्न !
आपल्याकडचे फिल्मी तारे कधी शॉर्टफिल्म्सच्या प्रेमात पडताना आपण सहसा पाहत नाही. मात्र याला अपवाद म्हणजे काजोल, श्रुती हसन, नेहा धुपिया, आपली मुक्ता बर्वे आणि नीना कुलकर्णी अशी तगडी कास्ट असणारी ‘देवी’ हि शॉर्टफिल्म. ती नुकतीच युट्युबवर रिलीज करण्यात आली आहे. व्यवसायिक हिंदी चित्रपटातल्या कलाकारांनी शॉर्टफिल्मकडे वळण तेवढं सोप्प नसलं तरी हि शॉर्टफिल्म एक विशिष्ट उद्दिष्ट घेऊन करण्यात आली आहे.
चित्रकथा । २०१२ च्या दिल्ली बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, हा एक लघु चित्रपट आहे. समाजात सतत होत असलेल्या न्यायालयीन निर्णय विलंबामुळे समाजातील निराशा यात दिसून येते. प्रियंका बॅनर्जी यांच्या ‘देवी’ने बलात्कार किंवा लैंगिक अत्याचाराचा बळी पडलेल्या, बहुधा मृत झालेल्या आणि अशा प्रकारे एका खोलीतच बंद असलेल्या पण वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील स्त्रियांची काल्पनिक स्थिती दर्शविली आहे.
काजोल अशा स्त्री ची भूमिका करतेय जी बाकी सर्व स्त्रियांना एकत्र बांधून ठेवण्यास कारणीभूत आहे. चित्रपटातील देवी तिच्यात बघायला हरकत नाही. थोड्या एस्टॅब्लिशमेंट
नंतर आणखी एकजण पीडित स्त्री दाराशी बेल वाजवून उभी राहते. यामुळे महिलांमध्ये चर्चेला वेग येतो कि त्या नवीन महिलेचे स्वागत करावे की नाही. यावरून अनेक वाद होतात आणि त्यांच्यात गट पडतात.
संभाषणाच्या संपूर्ण कालावधीत, महिला आपल्या भक्षकांची ओळख आणि वय आणि त्यांच्यावर ज्या प्रकारे अत्याचार केले गेले त्याविषयी चर्चा करतात. काही, विशेषत: वृद्ध ग्रामीण स्त्रिया, त्यांचे भयानक भाग आठवून सांगतात. जे ऐकल्यावर कोणाच्याही मनात तीव्र सहानुभूतीची भावना जागृत होईल.
शेवटी काजोलची व्यक्तिरेखा म्हणते कि त्या पापी लोकांत राहण्यापेक्षा तरी हि खोली चांगलीच आहे” असं म्हणून शेवटी ती नव्या पीडितेला दरवाजा उघडते आणि सर्वाचं लक्ष नव्या पीडितीकडे जातं. एकूणच भीषण पण वास्तवाशी साम्य असणारा असाच शेवट या गोष्टीचा होतो
सर्व पात्रांची नावे कशी उघड केली जात नाहीत, यामागे लैंगिक अत्याचार पीडितांना कोणताही चेहरा नसतो हे अधोरेखित करण्याचा असावा. प्रियांका यांच्या लेखणीतून घडलेला हा चित्रपट १० मिनिटात त्याचं बोलणं संपवतो आणि हेच त्याच मोठं वैशिष्ट्य आहे.
काजोल, नेहा, श्रुती आणि मोजकेच संवाद मिळालेली मुक्ता यांनी पात्रांना न्याय दिलेला आहे. पण सर्वात जास्त प्रभावित करून जातात त्या आपल्या काहीशा निगेटिव्ह भूमिकेतील नीना कुलकर्णी. त्यांनी ग्रामीण वयस्कर मराठी स्त्रीच्या पात्रात जीव ओतलाय.
चित्रपटाची गोष्ट व्हिज्युअली देखील तेवढीच बोलकी आहे. टीव्हीच्या अस्थिर आवाजापासून ते बलात्काराचा केस कव्हर करणाऱ्या एका पुरुष रिपोर्टरपर्यंत, आणि शेवटी एका महिला पत्रकाराने देशात बलात्काराच्या आकडेवारीबद्दल भाष्य केलेले भाष्य देखील त्याचा भाग आहे.
काजोल सारख्या कलाकाराने आपलं स्टारडम बाजूला ठेवत अशी पावलं उचलल्यामुळे तीच खास कौतुक.