Take a fresh look at your lifestyle.

धर्मेंद्रने शेअर केले त्यांच्या शेतातील फोटो… हातात दिसला फुलकोबी,शेतात टोमॅटोही घेतले … पहा व्हिडिओ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता धर्मेंद्र आजकाल आपल्या फॉर्म हाऊसमध्ये दर्जेदार वेळ घालवत आहे. ते नियमित अंतराने त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर त्यांच्या शेतात पिकविलेल्या भाज्या आणि फळांचे व्हिडिओ शेअर करत असतात. धर्मेंद्र यांनी पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी आपल्या शेतात पिकविलेल्या भाज्या आणि फळांची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर, त्यानी लिहिले: “या हंगामातील सर्व भाज्या माझ्या मेहनतीचे फळ आहे.” धर्मेंद्रच्या या व्हिडिओचा लोक खूप आनंद घेत आहेत.

 

धर्मेंद्र यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ५० हजाराहून अधिक व्युज मिळाली आहेत. चाहतेदेखील या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काही दिवसांपूर्वी धर्मेंद्रने एका मस्त कारसह एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तो खूपच आश्चर्यकारक स्टाईल मध्ये दिसत आहे. धर्मेंद्र सोशल मीडियावर सध्याला खूपच अ‍ॅक्टिव आहे, आणि आपल्या चाहत्यांशी सतत संपर्क ठेवतत् आणि आपल्या आयुष्याशी संबंधित नवीनतम अपडेट्सही देत ​​राहतात.


View this post on Instagram

One fine morning, I will trace you my sweet tweety! Friends, So refreshing morning at my farmhouse. Love 💖 you all.

A post shared by Dharmendra Deol (@aapkadharam) on Jun 8, 2019 at 5:55pm PDT

 

धर्मेंद्र यांचे खरे नाव धरमसिंह देओल आहे. धर्मेंद्र यांचे बालपण साहणेवालमध्ये गेले. धर्मेंद्रचे वडील शाळेचे मुख्याध्यापक होते. धर्मेंद्रने १९६० मध्ये अर्जुन हिंगोरानी यांच्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. १९७० च्या दशकाच्या मध्यावर धर्मेंद्र जगातील सर्वात देखणा पुरुषांपैकी एक होता. धर्मेंद्र यांना वर्ल्ड आयर्न मॅन अवॉर्डही देण्यात आला आहे. धर्मेंद्रच्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये ‘सत्यकाम’, ‘खामोशी’, ‘शोले’, ‘क्रोधी’ आणि ‘यादों की बरात’ यांचा समावेश आहे.