Take a fresh look at your lifestyle.

… आणि दिया मिर्झाला अचानक रडू कोसळले !

टीम, हॅलो बॉलीवूड । अभिनेत्री दिया मिर्झा जयपूर साहित्य महोत्सवात ‘क्लायमेट चेंज’ म्हणजेच हवामान बदला संदर्भातील पॅनेल चर्चेदरम्यान अचानक भावुक झाली, तिला रडू कोसळलं. तिला त्याचे कारण विचारले असता मिर्झा म्हणाल्या, “काल माझा दिवस खरोखरच चांगला जात होता, पण पहाटे 3 च्या सुमारास कोबे ब्रायंट या महान खेळाडूचा मृत्यू झाल्याच्या बातमीचं फोनवर नोटिफिकेशन आले.

अमेरिकन बास्केटबॉलचा दिग्गज खेळाडू कोबे ब्रायंट आणि त्याची १-वर्षांची मुलगी जियाना मारिया सोबत नऊ जण हेलिकॉप्टर मधून प्रवास करताना धुक्यामुळे त्याचा अपघात झाला. सर्व जगातून त्याला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

   “कॅलिफोर्नियामध्ये त्याच्या हेलिकॉप्टरच्या अपघातामुळे मला खूप त्रास झाला. हे खरोखर मला अस्वस्थ करत आहे”. वेगवेगळ्या गोष्टी ज्या आपल्याला वेगवेगळ्या दिवसांवर त्रास देतात, परंतु आपण स्वतः काळजी घेतो. माझा रक्तदाब कमी झाल्यामुळे मी अस्वस्थ झाले,” असे ती पुढे म्हणाली.