Take a fresh look at your lifestyle.

रजनीकांतच्या ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ भागाच्या प्रसारणाआधी डिस्कवरीने चाहत्यांना दिले डान्सिंग चॅलेंज

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । साऊथचा सुपरस्टार रजनीकांत बेअर ग्रिल्ससमवेत ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ मध्ये दिसणार आहे. शोचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले असून या भागाच्या प्रश्र्नांची तारीख आणि वेळ सांगितली आहे. हा शो डिस्कवरी चॅनलवर २३ मार्च रोजी रात्री ८ वाजता प्रसारित होणार आहे. रजनीकांतच्या शोच्या प्रसारणाच्या आधी डिस्कवरी चॅनलने चाहत्यांना डान्सचे आव्हान दिले आहे.

 

डिस्कवरी चॅनेलने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात एक गाणे वाजत आहे. चाहत्यांनी हे गाणे डाउनलोड करावे आणि #ThalaivaOnDiscovery या हॅशटॅग वर त्यांच्या डान्सच्या मूव्हसह व्हिडिओ शेअर करावा लागेल. चॅनलने ट्विट करुन लोकांनायामध्ये सहभागी होण्यास सांगितले आहे. हे ट्वीट शेअर करताना बेअर ग्रिल्सने लिहिले- मला ही या डान्स चॅलेंज मध्ये ग्राह्य धरा.

 

 

 

जानेवारीत रजनीकांतने कर्नाटकातील बांदीपूर टायगर रिझर्व येथे शूट केले. रजनीकांत मॅन व्हर्सेस वाइल्डमध्ये दिसणारा दुसरा भारतीय आहेत. याआधी ऑगस्ट २०१९ मध्ये पीएम मोदी या शोमध्ये बेअर ग्रिल्ससोबत अ‍ॅडव्हेंचर करताना दिसले.