Take a fresh look at your lifestyle.

ड्रीम गर्ल हेमा मालिनीने कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त फेटाळलं; व्हिडिओ पोस्ट करुन म्हणाल्या…

मुंबई | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना करोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान बिग बींसोबतच अभिनेत्री हेमा मालिनी यांना देखील करोनाची लागण झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र या चर्चांवर स्वत: हेमा मालिनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेमा मालिनी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “मला करोनाची लागण झालेली नाही. भगवान श्री कृष्णाच्या कृपेमुळे मी तंदुरुस्त आहे. माझी काळजी करण्यासाठी धन्यवाद.” त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.