Take a fresh look at your lifestyle.

एकता कपूरकडून भारतीय जवानांचा अपमान? युट्यूबरची पोलिसांत तक्रार

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । घरोघरी सासू सुनांच्या कट कारस्थानांच्या मालिकांमुळे पोहोचलेली एकता कपूर सतत वादातीत गोष्टींमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती तिच्या एका वेब सिरीजच्या ऍप मुळे चर्चेत आली आहे. आपल्या मेलोड्रॅमॅटिक मालिकांमुळे तिने छोट्या पडद्यावर मोठ्या प्रमाणात यश मिळविले. आता ती वेबसिरीज कडे वळली आहे. तिने अल्ट बालाजी नामक एक वेबसिरीज चे ऍप देखील सुरु केलं आहे. तिच्या या ऍपवरील एका सिरीज मध्ये तिने भारतीय सैनिकांचा अपमान केला असल्याचा आरोप युट्युबर हिंदुस्तानी भाऊ याने केला आहे.

अल्ट बालाजी या ऍपवर ट्रिपल एक्स नावाची एक सिरीज सुरु आहे. ही सैनिकांशी संबंधित सिरीज आहे. या सिरीजचा दुसरा सीझन आला आहे. यामध्ये एका सैनिकांची कथा दाखविण्यात आली आहे. हा सैनिक सीमेवर लढत असताना त्याच्या बायकोचे इतर पुरुषांसोबत अनैतिक संबंध असल्याचे या सिरीज मधून दाखविण्यात आले आहे. प्रसिद्ध भारतीय युट्युबर असणाऱ्या हिंदुस्तानी भाऊ याने यावर आक्षेप घेतला आहे. आणि एकता कपूरवर भारतीय जवानांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.

अभिनेते जितेंद्र हे एकता कपूरचे वडील आहेत. तर तुषार कपूर हा तिचा भाऊ आहे. अनेक भारतीय सिरीयलच्या माध्यमातून तिने छोटा पडदा गाजवला आहे. क्यो की सांस भी कभी बहू थी या सिरीयल मुळे एकता कपूर प्रसिद्ध झाली होती. याच सीरियलमध्ये स्मृती इराणीनेदेखील अभिनय केला होता.