‘काळीज तुटल्यागत झालं, पन तुझ्यावर राग नाय माझा’; सविता ताईंसाठी मानेंची भावनिक पोस्ट
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया, राजकारण, कलाविश्व सगळीकडे एकच प्रकरण गाजतंय. ते म्हणजे किरण माने प्रकरण. स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘मुलगी झाली हो’ यातून अचानक मानेंना काढून टाकले आणि एक वेगळाच वाद उफाळला. जोपर्यंत प्रोडक्शन किंवा चॅनेल आरोप करत होते तोपर्यंत मानेंच्या भावना दुखावल्या नव्हत्या. ते कणखर होते. मात्र जेव्हा मालिकेतील महिला सहकलाकारांनी मानेंवर गंभीर असे आरोप लावले त्यादिवशी मात्र मानेंना वाईट वाटल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमधून सांगितले. यातही अभिनेत्री सविता मालपेकर यांचा उद्रेक पाहून किरण मानेंना फारच वाईट वाटलं असं त्यांच्या पोस्टमधून समजतंय. पन, ‘म्हातारे, तुझ्यावर राग नाय गं माझा असं म्हणत त्यांनी एक भावनिक पोस्ट शेअर करून माणूस म्हणून पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये आपली उंची वाढवली आहे.
किरण माने यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं कि, मी लाडानं तुला ‘म्हातारे’ अशी हाक मारायचो… अगदी परवा-परवा शेवटच्या दिसापर्यन्त ! तू बी माझ्याशी लै प्रेमानं वागत हुतीस.. आपल्या शुटिंगच्या शेवटच्या दिसापर्यन्त !! अलीकडच्या दिवसांत कुनीतरी तुझे माझ्याबद्दल गैरसमज करून दिलेवते… “किरण लेखकांना सांगून तुझा पत्ता कट करतोय.” असं तुला वाटायला लागलं… तू मेकअपरुमध्ये बसून मला लै जोरजोरात शिव्या देत हुतीस… तवाबी मी तुझ्याशी भांडलो नाही. तुला भेटून मायेनं तुझा हात हातात घिवून तुझे गैरसमज दूर केलेवते.. तुला काही फॅक्टस् सांगीतल्यावत्या… नंतर तू लेखकांना फोन केल्यावर तुला कळलं की यात किरण मानेची चूक नव्हती…प्राॅडक्शन हाऊसमधुन लेखकांना सांगीतलं गेलंवतं की सविताताईंना वगळून सीन्स लिहा. तुला कळलं काय झालं असेल ते. ते गुपित तू माझ्याशी बोललीसबी.. आपण हसलो… आणि मग पुन्हा आपलं “म्हातारेS-इलासाS ” सुरू झालं… परवा तुला टीव्हीवर तावातावाने माझ्या इरोधात बोलताना मला धक्काच बसला ! वाईट वाटलं.. काळजात आत कायतरी लै तुटल्यागत झालं…
पन म्हातारे, तुझ्यावर राग नाही धरणार.. तुझीबी कायतरी मजबूरी आसंल गं… कुनाच्या पोटावर पाय येत असताना कुनी आसं बोलंल व्हय? आत्मा शांत बसंल का त्याचा.. म्हातारे असं बोलल्यावर राती तुला शांत झोप लागली का गं??? तुझ्या स्वामी समर्थांना तू काय कारन सांगीतलंस असं बोलल्याचं???? त्यांच्या फोटोसमोर बसुन तर आपन परवा परवा आपल्यातला गैरसमज मिटवलावता…असो. त्यांची तुझ्यावर कृपा राहो…माझं म्हन्शील तर मी न्याय मिळवल्याशिवाय जीव सोडणार नाही ! झगडणार… लढणार…तुला ठावं हाय दुनिया इरोधात गेली तरी सत्य जिंकतं यावर तुझ्या इलासाचा इस्वास हाय… जिंकल्यावर मात्र तुला भेटायला येईन.. येताना मी प्रेमानं तुझ्यासाठी चंद्रविलासची खारी बुंदी आणून देईन.सातारी कंदी पेढे आणून देईन.. पूर्वी आणून देत होतो, तश्शीच.. तेवढ्याच मायेनं ! तुझ्यावर राग नाय गं माझा..
किरण माने प्रकरणी महिला सहकलाकारांचा मोठा खुलासा
गैरवर्तन केल्याप्रकरणी दाखवली बाहेरची वाट@HelloBollywood4 #kiranmane @StarPravah pic.twitter.com/lSSnOmZ9Ra— Vishakha Mahadik (@Princy_Vishu) January 16, 2022
दरम्यान माध्यमांशी बोलताना सविता मालपेकर यांनी सांगितले होते कि, राजकीय पोस्टमुळे किरण माने यांना काढण्यात आले नाही तर त्यांच्या वागणुकीमुळे काढण्यात आले आहे. त्याला तडफडाकी काढण्यात आले नाही, त्यासाठी १३ नोव्हेंबर रोजी शेवटची मिटींग घेवून त्याला फायनली सांगण्यात आले होते की सेटवरून तुझ्याबाबत तक्रार आली तर मालिकेतून काढण्यात येईल असे सांगण्यात आले होते.