Take a fresh look at your lifestyle.

प्रसिद्ध कोरिओग्राफर धर्मेश येलांडेला कोरोनाची लागण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। डान्स दिवाने ३ या डान्सिंग रिऍलिटी शो चा जज आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर धर्मेश येलांडेला कोरोनाची लागण झाली आहे. डान्स दिवाने 3 या कार्यक्रमात होणाऱ्या धमाकेदार परफॉर्मन्समुळे या शोची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. मात्र काही दिवसांपासून या शो च्या सेटवरून धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी या शोच्या सेटवरील १८ क्रू मेंबर्सचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली होती.

डान्स दिवाने ३ या कार्यक्रमात बॉलीवूड धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दिक्षीत, तुषार कालिया आणि धर्मेश येलांडे असे तीन परिक्षक आहेत. तर राघव जुयाल या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आहे. धर्मेश पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या चाहत्यांसह सर्वांनाच धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार माधुरी आणि तुषार यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट नेगिटिव्ह आला आहे. तसेच या कार्यक्रमाच्या मेकर्सनी धर्मेशला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

E Times TV च्या अहवालानुसार ज्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात क्रू मेंबर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले, त्याचवेळी कार्यक्रमाचे निर्माते अरविंद राव यांनी त्वरित नवीन क्रू मेंबर्सची व्यवस्था केली होती. तसेच येणारे काही दिवस धर्मेश या कार्यक्रमाचा भाग नसणार आहे. काही दिवसांपूर्वी सोनी टीव्हीने शेअर केलेल्या प्रोमोमध्येदेखील धर्मेश दिसत नाही आहे. त्याच्याऐवजी या प्रोमोमध्ये कोरिओग्राफर पुनीत पाठक आणि शक्ति मोहन दिसत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.