Take a fresh look at your lifestyle.

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुभव सिन्हा, हंसल मेहता, सुधीर मिश्रा यांचा बॉलिवूडला रामराम

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन | गेल्या काही दिवसांपासून हिंदी इंडस्ट्रीत मोठे वाद होऊ लागले आहेत. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर हा वाद उफाळून आला. यात अनेक कलाकारांनी भाग घेतला आहे. कंगना राणौतने सुशांतच्या घटनेचा आधार घेत बॉलिवूडमध्ये कसा नेपोटिझम आहे, हे सांगितलं. ते सांगतानाच तिने काही दिवसांपूर्वी तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर या अभिनत्रींनाही या वादात ओढलं. त्यानंतर हा वाद आणखी पेटला. आता दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी थेट बॉलीवूड लाच रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलाय .सिन्हा यांनी आत्तापर्यंत मुल्क, थप्पड, रा-वन, आर्टिकल -15 असे अनेक हिट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. विशेष बाब अशी की, दिग्दर्शक हंसल मेहता आणि सुधीर मिश्रा यांनीही या त्यांच्या निर्णयाला दुजोरा देत बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ट्विटरवर पोस्ट करत सांगितलं की, ‘मी आता बॉलिवूडचा राजीनामा देत आहे. त्याचा अर्थ तुम्हाला काय घ्यायचा तो घ्या. असं सांगतानाच त्यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवर आपल्या नावानंतर नो बॉलिवूड असंही लिहिलं आहे. अर्थात ही पोस्ट आल्यानंतर एकच गहजब झाला. बॉलिवूडचा राजीनामा म्हणजे, अनुभव सिन्हा सिनेमे बनवणार की, नाही असा प्रश्न अनेक नेटिझन्सनी विचारला. त्यावर आपण सिनेमे बनवण्यासाठीच इथे आलो. आपण सिनेमे बनवूच. पण त्याची पद्धत आता बदललेली असेल असंही सांगितलं. आता येत्या काळात कसे सिनेमे बनवणार ते मात्र काही काळानंतर कळेल असंही त्यांनी सांगितलं आहे.

Comments are closed.