अभिनेत्री क्रिती सॅननचा ‘मिमी’ लूक पाहून चाहते संभ्रमात; पहा व्हिडीओ
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या चांगलीच संपर्कात आहे. त्यामुळे ती नेहमीच वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकताच तिने आपल्या चाहत्यांना संभ्रमात टाकणारा आणि त्यांचे लक्ष वेधून घेणारा असा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
मुख्य म्हणजे क्रितीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती चक्क बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत तिने समर्पक असे कॅप्शनही दिले आहे. अर्थात हा लूक तिचा काय खऱ्या खुऱ्या आयुष्यातला नाही. मात्र तरीही क्रितीचा बेबी बंप चाहत्यांना बुचकळ्यात पाडून गेला. मुळात हा क्रितीचा आगामी सिनेमा आहे. या सिनेमाचे नाव मि’मी’ असून याचा हा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर १३ जुलै २०२१ रोजी येणार आहे. सोशल मीडियावर क्रितीने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक सेलेब्रिटी आणि तिचे चाहते शुभेच्छांच्या कमेंट्स करताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे ही पोस्ट इतकी व्हायरल झाली आहे की बस्स. या सिनेमात क्रिती एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात ती सरोगेट आईच्या भूमिकेत दिसणार आहे. एका छोट्याशा खेड्यातली मुलगी अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहत असते. यादरम्यान ती एका कपलला भेटते आणि सरोगेट आई बनण्याचा निर्णय घेते. या निर्णयानंतर त्याच्या आयुष्यात कोणते घडामोडी घडतात हे पाहण्यासाठी मिमी पाहावंच लागेल. मिमीसाठी क्रितीने आपले वजन तब्बल १५ किलोने वाढवले होते. या सिनेमात पंकज त्रिपाठी, सुप्रिया पाठक आणि सई ताम्हणकर हे कलाकार देखील अन्य भूमिकेत दिसणार आहेत.