Take a fresh look at your lifestyle.

शाहरुखला पाहून रडू लागला चाहता, व्हिडीओ व्हायरल

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन |बॉलिवूड अभिनेत्यांचे लाखो चाहते असतात. हे चाहतचे आपल्या आवडत्या कलाकाराला पाहण्यासाठी आतुर असतात. त्यांना पहिल्यावर कधीकधी चाहते भावूकही झाल्याचे दिसते. बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या चाहत्याचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुखचा चाहता त्याला पाहून रडू लागतो.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख चाहत्यांच्या गर्दीमधून चालला असतो. दरम्यान तो एका चाहत्याला भेटतो. आपल्या आवडत्या कलाकाराला भेटल्यामुळे तो चाहता आनंदी होतो. दरम्यान तो भावूक झाल्याचे पाहायला मिळते.

शाहरुख खानचा हा व्हिडीओ वूम्प्लाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये शाहरुख खानचा चाहता सेल्फी घेताना दिसत आहे. सेल्फी घेताना तो भावूक झाल्याचे देखील पाहायला मिळते. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

Comments are closed.