Take a fresh look at your lifestyle.

‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका चोप्राने सेटवरील आठवणींना दिला उजाळा

हॅलो बॉलीवूड । मधुर भांडारकर यांच्या ‘फॅशन’ चित्रपटाला आज 12 वर्षे पूर्ण झालीत.  या चित्रपटात प्रियांका चोप्रा, कंगना रनौत आणि मुग्धा गोडसे यांनी मुख्य भूमिकेत काम केले आहे. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला आज 2020 मध्ये 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रियांकाने सेट वरील आठवणी सोशल मीडिया वर शेयर केल्या आहेत.

“जलवा … ये जलवा … फॅशन का है ये जलवा …” मधुर भांडारकरांच्या ‘फॅशन’ मधला हा आयकॉनिक टाइटल ट्रॅक सर्वांना आठवेल असाच होता.  ‘फॅशन’ या अनोख्या कथेसह या  चित्रपटाने ग्लॅमरच्या जगासमोर कधीही न पाहिलेल्या कथेची ओळख करून दिली होती.

आजही हा चित्रपट महिला केंद्रित चित्रपट म्हणून ओळखला जातो. चित्रपटात फॅशन डिझायनर राहुल अरोराची भूमिका  समीर सोनी यांनी साकारली आहे.

फॅशन चित्रपटाची कथा एक महत्वाकांक्षी  मुलीची आहे. मेघना माथूर म्हणजेच प्रियंका चोप्रा , जी की  सुपर मॉडल म्हणून फॅशन इंडस्ट्रीमध्ये खूप मोठं काम करू इच्छित आहे.  स्वप्नांच्या शहरात, मुंबईने सुरवातीला पोहोचण्यासाठी तिचा संघर्ष सुरू करते. चित्रपटात एक डायलॉग आहे, “फॅशन में जितना कम सोचोगी उतना झ्यादा कामाओगी”.  मधुर भांडारकर यांनी फॅशन इंडस्ट्रीच्या पार्श्वभूमीवर  एक कथा घेऊन सत्य परिस्थिती दाखवण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आहे.


Comments are closed.