Take a fresh look at your lifestyle.

फिटनेस फ्रिक अनन्या पांडेचं गजब योगा कौशल्य; फोटो झाला वायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नेहमीच कसं फिट आणि फाईन दिसायच आहे असा सर्व कलाकार मंडळींचा अट्टाहास असतो. यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात. मग किती बीजी असले तरीही फिटनेसच्या बाबतीत हयगय? अजिबातच नाही. अनेक कलाकार मंडळी आपलं शूटिंग शेड्युल संपवून कधी जिममध्ये तर कधी योग सेंटरमध्ये जाताना किंवा मग येताना दिसत असतात. कामाच्या गडबडीमुळे त्यांचे खूप अजब गजब फिटनेस फंडे असतात हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते देखील अत्यंत उत्सुक असतात. स्टारकिड अनन्य पांडेसुद्धा अशीच आपल्या फिटनेसच्या बाबतीत खूपच काळजी घेताना दिसते. तिचा एक फोटो देखील चांगलाच वायरल होतोय.

फिटनेसबाबत सजग असलेली स्टारकिड अभिनेत्री अनन्या पांडे हिने आपल्या अभिनयाने रसिकांच्या काळजात फारसं स्थान निर्माण केलं नसलं तरीही प्रयत्न मात्र ती करतेय. दरम्यान ती आपल्या फिटनेसवर फार लक्ष देते. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना फिटनेस टीप्सही देते. अनन्य योगा, जिमसह डाएटसुद्धा कटाक्षाने पाळते. अनन्याचे बरेच फोटो तुम्हालाही जिममध्ये जाऊन वर्कआऊट करण्यासाठी प्रेरणा देतील असे आहेत. तिचे फिटनेस मंत्र तर कोणीही आपल्या डेली रूटीनमध्ये समाविष्ट करू शकतं असेच आहेत.

विशेष म्हणजे कितीही बिझी शेड्युल असुदे अनन्या आपल्या फिटनेसची काळजी घ्यायला अजिबात चुकत नाही. आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे ती नेहमीच बारकाईने लक्ष देत असते. ती सररोजच्या दैनंदिन जीवनात योगासनाद्वारे स्वतःला फिट ठेवते. तिला अनेको कठीण कठीण योगासने येतात. यामुळे दररोज विविध आसनं करत ती स्वतःला फिट ठेवत असते. असेच एक आसन करतानाचा अनन्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. हा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला असून आतापर्यंत या फोटोला तिच्या चाहत्यांकडून अनेक लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत आणि अनेक लोक तिचे कौतुक करताना थकत नाहीयेत.