Take a fresh look at your lifestyle.

दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘दंगल गर्ल’ झायरा वसीमचा मोदी व अक्षय ला टोला

हॅलो बॉलिवूड ऑनलाइन । दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ‘दंगल गर्ल’ झायरा वसीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी व अभिनेता अक्षय कुमार यांना टोला लगावला आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारने नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत राजकीय प्रवासासोबतच मोदींचं बालपण,त्यांची जडण घडण,त्यांचं विरोधकांसोबतचं नातं आणि विशेष म्हणजे त्यांना आंबे खायला आवडतात का हा प्रश्नसुद्धा विचारला गेला होता. याच संदर्भावरून झायराने मोदी व अक्षय कुमारला टोमणा मारला आहे.

‘तुम्ही आंबे खाता का याऐवजी तुम्हाला रात्री शांत झोप कशी लागते हा प्रश्न विचारायला पाहिजे’, असं खोचक ट्विट झायराने केलं आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यावरून (सीएए) दिल्लीत हिंसक आंदोलन झाले. या हिंसाचारात अनेकांचे प्राणही गेले. दिल्लीतल्या या हिंचासाराविरोधात हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारेप्रतिक्रिया दिली. त्यात झायराने केलेल्या या ट्विटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. नरेंद्र मोदींची अक्षय कुमारने घेतलेली मुलाखत आणि त्या मुलाखतीत त्यांना विचारलेला आंब्याचा प्रश्न त्यावेळी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.

झायराने चित्रपट सृष्टी सोडली आहे. ‘हे क्षेत्र मला माझ्या ईमानपासून दूर खेचत आहे,’ असं म्हणत तिने बॉलिवूडला रामराम ठोकला. मात्र सोशल मीडियावर ती सक्रिय आहे आणि चालू घडामोडींवर ती ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त होत असते.

Comments are closed.