Take a fresh look at your lifestyle.

हंगामा प्ले’च्या ‘अधांतरी’ सिरीजमध्ये झळकणार सिद्धार्थ चांदेकर आणि पर्ण पेठेची फ्रेश जोडी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अहिनेत्री पर्ण पेठे हे लवकरच हंगामा प्ले’च्या ‘अधांतरी’ या आगामी मराठी शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. हि जोडी एकदम नवी आणि फ्रेश असल्यामुळे प्रेक्षकांचीही उत्सुकता याबाबत अधिक आहे. याशोमध्ये माझा होशील ना फेम अभिनेता विराजस कुलकर्णी, पाहीले ना मी तुला फेम आशय कुलकर्णी आणि बिग बॉस मराठी २ फेम आरोह वेलणकर या अभिनेत्यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. ‘अधांतरी’ ही सिरीज मजेशीर, प्रेमळ आणि प्रत्येकाला आपलीशी वाटेल अशी एक रोमँटिक कॉमेडी ड्रामा असणारी कथा आहे. लाँग-डिस्टंस अर्थात किलोमीटरने लांब पण मनाने मात्र जवळ अश्या नात्यात असलेल्या जोडप्याला काही कारणांमुळे बराच काळ एकत्र रहावे लागते. पुढे ही कारणे त्यांच्या नियंत्रणाबाहेर जातात आणि हि कथा वेगळीच वळणे घेताना दिसते.

क्लासमेट, लॉस्ट अँड फाऊंड, ऑनलाइन बिनलाइन, गुलाबजाम, रणांगण अशा अव्वल मराठी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाच्या जोरावर सिद्धार्थने एक वेगळीच जादू प्रेक्षकांवर केली. इतकेच काय तर सांग तू आहेस का? जीवलगा, प्रेम हे या मालिका आणि अगदी सिटी ऑफ ड्रिम्स वेब सिरीज यातील त्याच्या भूमिका प्रचंड गाजल्या आहेत. दरम्यान अंधातरीमधील व्यक्तिरेखेविषयी तो म्हणतो कि, “मागील वर्षभरात प्रत्येक जोडप्याला जो अनुभव आलाय असाच काळ यात आहे. त्यामुळे ही कथा फारच आपलीशी वाटते. शिवाय, पर्ण आणि माझी व्यक्तीरेखाही अगदी तुमच्या-आमच्यासारखी आहे. प्रत्येक जोडपं बांधिलकी, अनुरूपता आणि एकमेकांशी अधिक घट्ट बंध असावेत अशी अपेक्षा करतो. या शोमध्ये हे सगळे प्रश्न काहीशा नाट्यमय मात्र विनोदी पद्धतीने मांडण्यात आले आहेत.”

फास्टर फेणे, फोटोकॉपी, बघतोस काय मुजरा कर, वायझेड, रमा माधव असे दर्जेदार चित्रपट आणि विविध नाटकांमधील पात्रे याच्या जोरावर पर्ण पेठेने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निश्चित केले. दरम्यान या सिरींजविषयी बोलताना पर्ण म्हणाली कि, “परफेक्ट नसलेल्या लोकांच्या जगात एकदम परफेक्ट बसणारी कथा आहे अंधातरीची. मी मुग्धा या मुंबईतील एका मुलीची भूमिका साकारली आहे. ती लाँग डिस्टंस रिलेशनशीपमध्ये आहे. मात्र, बॉयफ्रेंडसोबत खूप मोठा काळ घालवाला लागतो तेव्हा एकेक गोष्टी स्पष्ट होत जातात. हल्लीच्या आधुनिक जगात नातेसंबंध टिकवून ठेवणे लोकांसाठी फारच कठीण झाले आहे. अशा जगातील अनेक गोष्टींचं प्रतिबिंब यात दिसेल.” गणराज असोसिएट्स निर्मित आणि जीत अशोक दिग्दर्शित हा शो लवकरच हंगामा प्ले आणि पार्टनर नेटवर्क्स उपलब्ध असेल.