Take a fresh look at your lifestyle.

वरुन धवनने सौरव गांगुलीचा ‘हा’ फोटो शेयर करुन दिल्या शुभेच्छा; म्हणाला तो क्षण यादगार

मुंबई | माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीचा आज वाढदिवस आहे. त्याचे चाहते आणि मित्र सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा देत आहेत. केवळ क्रिकेटपटूच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा त्याच्या खास दिवशी सौरवला शुभेच्छा देत आहेत. अभिनेता वरुन धवल यांनेही सौरव गांगुलीचा एक मेमोरेबल फोटो शेयर करुन दादाला शुभेच्छा दिल्या आहेत.

नुकताच अभिनेता वरुण धवनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन सौरवचे आयकॉनिक थ्रोबॅक पिक्चर शेअर केले. २००२ च्या नेटवेस्ट मालिकेतील त्याने एक चित्र शेअर केले जे सर्व भारतीयांसाठी अत्यंत खास आहे.

सौरव गांगुलीचा आयकोनिक फोटो शेयर करताना वरुणने लिहिले की हा फोटो माझ्या आठवणीत कायमसाठी कोरलेला आहे. “2002 Natwest series विजय ही प्रतिमा माझ्या आठवणीत कायमची चिकटलेली आहे. परकीय मातीवर विजय मिळवणे दुसऱ्या कोणाचीही हिंमत नाही #happybirthdaydada . तसेच युवराज सिंह आणि मोहम्मद कैफ यांची भागीदारी ही कधीही विसरू शकत नाही.