Take a fresh look at your lifestyle.

सरकारच्या जमावबंदीवर ‘गदर’ चे दिग्दर्शक अनिल शर्मा म्हणाले कि,”दर चार वर्षांनी एक किंवा दोनदा…”

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । कोरोनाव्हायरस रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. पहिला उद्देश हा आहे कि एकाच ठिकाणी जास्त जमाव गोळा होणार नाही याची काळजी घेणे. अलीकडेच याचविषयावरुन ‘गदर’ आणि ‘वीर’ सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी ट्विट केले आहे जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की सध्या प्रदूषण कमी होत आहे, रहदारीदेखील नाही, रस्त्यावर लोक कमी आहेत. या पुढे ते म्हणाले की, जगाने असा नियम बनविला पाहिजे ज्यामध्ये दरवर्षी एक ते दोन आठवड्यांची सुट्टी असावी. अनिल शर्माच्या या ट्विटवर बरीच चर्चा होते आहे, त्याचबरोबर लोक यावर प्रतिक्रियाही देत आहेत.

 

कोरोनाव्हायरसबद्दल आपले मत मांडत अनिल शर्मा यांनी ट्विट केले की, “आजकाल प्रदूषण कमी झाले आहे, रहदारी नाही, रस्त्यावर लोक कमी आहेत आणि जग डिटोक्स मोडवर आहे. खरं तर जग प्रत्येक चार वर्षांनी एक ते दोन आठवड्यांची सुट्टी असावी असा नियम बनवावा. जेणेकरून काही गोष्टी थांबू शकतील आणि जग एक चांगली जागा बनू शकेल. “कोरोनाव्हायरससंदर्भात ५० हून अधिक लोकांच्या जमाव करणे यावर सरकारने बंदी घातली आहे. गर्दी पाहून पश्चिम रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत १० रुपयांवरून ५० रुपयांवर आणली. शाळा व महाविद्यालयेही बंद करण्यात आली आहेत.

अनिल शर्मा आपल्या चित्रपाटांखेरीज ट्वीटसाठीही खूप परिचित आहेत. ते आपले मत सोशल मीडियावर बिनधास्तपणे व्यक्त करत असतात. त्याचवेळी, कोरोनाव्हायरसबद्दल बोलत असताना, मुंबईतल्या एका ६४ वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला. या विषाणूमुळे देशातील मृत्यूची ही तिसरी घटना आहे. कोविड -१९ मुळे मृत्यूची महाराष्ट्रातील ही पहिली घटना आहे, तर मृताच्या पत्नीची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments are closed.

%d bloggers like this: