Take a fresh look at your lifestyle.

‘गुड न्यूज’ बॉक्स ऑफिसवर सुसाट ! अवघ्या सहा दिवसात जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

टीम, हॅलो बॉलीवूड । सुपरस्टार अक्षय कुमार, करीना, दिलजीत आणि कियारा यांचा गुड न्यूज चित्रपट सुट्ट्यांच्या मदतीने बॉक्स ऑफिसवर लूट करतोय. बऱ्याच दिवसांनी चांगला विनोदी चित्रपट आल्याने त्यात मागच्या आठवडत्यात वीकेंड्स सोबत न्यू इयर मुळे लोकांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला.

चित्रपटाची संकल्पना आणि कथा खूप रंजक असल्याने लोकांनी माऊथ पब्लिसिटी केली, त्यामुळे चित्रपटाने हे यश बघितले. २०१९ हे बॉलीवूड साठी खूप चान्गले वर्ष गेलं असून २०१९ मधला हा १०० कोटीवाला शेवटचा चितारपट ठरला. अक्षयकुमारची ही सलग सहावी सेंच्युरी आहे. जुन्या स्टार्स मध्ये त्याचे स्टारडम वाढत जाताना आपल्याला दिसतंय.

चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरची कामगिरी पाहता, आणि पुढच्या आठवड्यात मोठे चित्रपट रिलीज नाहीत हे लक्षात घेता चित्रपट एकूण २०० करोडचा आकडा पार करून २१५ कोटींपर्यंयत मजल मारू शकतो.