Take a fresh look at your lifestyle.

“XXX या काल्पनिक कथेसाठी इतका गोंधळ का?” – हिना खान

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । सध्याला एकता कपूरच्या XXX ही वेब सीरिजची जोरदार चर्चा होते आहे. नुकतेच हिंदुस्तानी भाऊ या युट्युबरने एकता कपूर विरोधात पोलीसांत तक्रार दाखल केली होती. या वेब सीरिजमधील काही दृश्ये ही आक्षेपार्ह असल्याचे त्याचे म्हणणे आहे. यावर एकता कपूरने माफी मागुन हे प्रकरण संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही तिच्यावर होणारी टीका अद्यापही थांबलेली नाही. आता अभिनेत्री हिना खान ही एकता कपूरच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे. “एका काल्पनिक कथेसाठी इतका गोंधळ का?” असा प्रश्न तिने यावेळी उपस्थित केला आहे.

 

“वेब सीरिजमधील काही सीन्समध्ये सैनिकांचा अपमान केला जात असल्याचे सांगितले जात होते. तसेच सैनिकांचा अपमान कोणीही सहन देखील करु नये. अनवधानाने झालेली चुकी दुरुस्त करण्यात आली आहे. मात्र यासाठी एका महिलेला बलात्काराची धमकी दिली जातेय. एखाद्या काल्पनिक कथेसाठी एका महिलेच्या कुटुंबियांना धमकावणं योग्य आहे का? असा प्रश्न यावेळी हिना खाननं विचारला आहे.” हिनाचं हे ट्विट सोशल मीडियावर सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

हे प्रकरण नक्की काय आहे जाणून घेउयात ?
एकता कपूरच्या XXX ही वेब सीरिज आहे. ‘XXX’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सिजनमध्ये भारतीय सैन्य दलातील एका सैनिकांची स्टोरी दाखवण्यात आली आहे. यामध्ये हा जवान सिमेवर असताना त्याची बायको इतर पुरुषांसोबत अनैतिक संबंध ठेवताना दाखवण्यात आले आहे. या कथेमुळे समाजात चुकीचा समज पसरत आहे आणि सैनिकांच्या कुटुंबियांचा अपमान होत आहे, असा आरोप करत हिंदुस्तानी भाऊने एकता कपूरच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती.