Take a fresh look at your lifestyle.

या हॉलिवूड स्टारलाही डीडीएलजेची भुरळ शाहरुखच्या अंदाजात म्हंटला ‘हा’ संवाद,व्हिडिओ व्हायरल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । हॉलिवूड स्टार ख्रिस हेम्सवर्थ याचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो १९९५ च्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या लोकप्रिय संवाद बोलताना दिसत आहेत.

त्याचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. मागील वर्षी ‘एक्सट्रॅक्शन’या चित्रपटामधील हेम्सवर्थची को-स्टार असलेल्या रुद्राक्ष जयस्वाल यांनी हा व्हिडिओ शेअर केला होता. जेव्हा हा व्हिडिओ पहिल्यांदा चाहत्यांसमोर आला तेव्हादेखील हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

 

आता ख्यातनाम फोटोग्राफर विरल भयानी यांनी पुन्हा हॉलिवूड स्टार ख्रिस हेम्सवर्थ यांचा हा जुना व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो काजोल-शाहरुखच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटाचा संवाद बोलताना दिसत आहे.या व्हिडिओमध्ये असे दिसून येते आहे की,हेम्सवर्थ या चित्रपटाचा लोकप्रिय संवाद ‘मोठ्या मोठ्या शहरांमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी घडतात’ असे म्हणत आहे.हा व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडला आहे.

 

Comments are closed.