Take a fresh look at your lifestyle.

आयुष्यमानचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान!’ चा ट्रेलर रिलीज; खळखळून हसवणारा महत्वाचा चित्रपट

पिक्चर अभी बाकी है । ‘समलैंगिकता’ या गंभीर विषयावर खुमासदार विनोदी शैलीत आयुष्यमान खुराणा, दिग्दर्शक हितेश केवाल्या आणि निर्माते आनंद एल राय यांनी नवीन चित्रपट आणला आहे. नाव आहे ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’! खूप गरजेचं असलेला असा हा चित्रपट आहे, याचा ट्रेलर खूप मनोरंजक असून आयुष्यमानची सुपरहिटची गाडी थांबण्याचे सध्यातरी नाव घेणार नाहीये असच दिसतं .

     या विषयावर बॉलीवूडमध्ये मोजके चित्रपट बनले. यावेळी या गंभीर विषयावर बोलण्यासाठी विनोदी शैली निवडली आहे. म्हणूनच ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाकडून मात्र जास्त अपेक्षा आहेत. सोबत अशा गोष्टींमध्ये माहीर असलेला ‘आयुष्यमान खुराणा’ चित्रपट लीड करतोय आणि वेब सेरीजमधला स्टार असलेल्या जितेंद्र कुमार उर्फ जितूने बॉलीवूड मध्ये डेब्यू केला आहे.

सलग सात हिट चित्रपट देणारा अभिनेता आयुष्मान खुराना त्याच्या पुढच्या ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटात समलैंगिक प्रियकराच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाविषयी वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज लावले जात आहेत, पण आयुष्मान म्हणतो की हा एक संपूर्णपणे कौटुंबिक करमणूक करणारा चित्रपट आहे, त्यात एक महत्त्वाचा संदेश देखील आहे आणि माझे चाहते हा चित्रपट कोणतीही शंका न ठेवता आपल्या कुटुंबातील सदस्यांसह पाहू शकतात. ट्रेलर रिलीज होताना आयुष्यमान म्हणतो, “मला जास्तीत जास्त लोकांचे मनोरंजन करायचे आहे.” कलाकार म्हणून, सिनेमा पाहिल्यानंतर त्याचा आनंद घेण्याबरोबरच सोबत काहीतरी संदेश घेऊन घरी येणे यापेक्षा मोठा आनंद कोणताच नाही. शुभ मंगल ज्यादा सावधानही एक महत्त्वाचा सामाजिक संदेश देईल, याची खात्री बाळगा.

       चित्रपटाचे निर्माता आनंद एल राय म्हणतात कि हा एक पुरोगामी चित्रपट आहे. या फ्रँचाइजीचा शेवटचा चित्रपट लैंगिक आजार आणि लग्न यावर बनविला होता. ट्रेलर रिलीज झाला असून खूप अपेक्षा आहेत. आयुष्मान खुराना आणि जितेंद्र कुमार यांच्या जोडीवर लोकांचे लक्ष लागून आहे. ‘बधाई हो’ या चित्रपटात भूमिका साकारलेल्या गजराज राव आणि नीना गुप्ताची जोडीही यावेळी वेगळ्या स्टाईलमध्ये दिसणार आहे.