Take a fresh look at your lifestyle.

“हृतिक, तुझ्या पुढच्या चित्रपटाची घोषणा लवकर कर !” चाहत्यांची कळकळीची विनंती ट्विटरवर ट्रेंडिंग!

सोशल कट्टा | ‘सुपर 30’ आणि ‘वॉर’ च्या तुफान यशानंतर सुपरस्टार हृतिक रोशनच्या चाहत्यांमध्ये कमालीची भर पडली आहे. याचीच झलक सध्या सोशल मीडियावर मिळत आहे. हृतिकने ही त्यांचा पुढचा चित्रपट कोणता आहे, त्याचे यावर्षी काय प्लॅन्स आहेत हे कोणालाच माहिती नाहीये.

झालं असं की एका चाहत्याने हृतिक ला तुझा पुढचा चित्रपट कोणता आहे असं विचारलं, त्यानंतर सगळेच चाहत्यांनी हा प्रश्न उचलून धरला, त्यामुळे ट्विटरवर दिवसभर ‘#HRITHIK ANNOUNCE NEXT MOVIE’ हा हॅशटॅग ट्रेंड करत होता. हजारोंच्या संख्येत लोकांनी ट्विट्स केल्या.

यावर बरेच memes ही तयार झालेत. ते ही तुम्ही खाली बघू शकता. आशा करूयात की हृतिकने हे सगळे प्रश्न वाचले असतील आणि लवकरच तो त्याचा पुढचा प्रोजेक्ट घोषित करेल. आणि चाहत्यांना समाधान मिळेल

 

Comments are closed.

%d bloggers like this: