Take a fresh look at your lifestyle.

१७ वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या हंगामा चित्रपटाचा येणार रिमेक,परेश रावल दिसणार मुख्य भूमिकेत

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । २००३ साली रिलीज झालेला सुपरहिट कॉमेडी फिल्म हंगामा या चित्रपटाचा आता लवकरच सिक्वेल बनणार आहे. ‘हंगामा २’ मध्ये शिल्पा शेट्टी, परेश रावल, मिझान जाफरी, दाक्षिणात्य अभिनेत्री प्रणीता सुभाष आणि राजपाल यादव हे या चित्रपटामध्ये भूमिका करताना दिसणार आहेत. नुकतेच चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले, ‘हंगामा २ नवीन पोस्टर .. परेश रावल, शिल्पा शेट्टी कुंद्रा, मिझान जाफरी आणि प्रणिता सुभाष … प्रियदर्शन हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत, तर रतन जैन, गणेश जैन, चेतन आर जैन आणि अरमान व्हेंचर्स संयुक्तपणे निर्मिती करणार आहेत.

‘हंगामा २’ यावर्षी १४ ऑगस्टला प्रदर्शित होईल. त्याच वेळी, ‘अत्तरीनतिकि दरेदी’, ‘सगुनी’, ‘पोरकी’ और ‘ब्रह्मा’ या दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री प्रणीता सुभाष हंगामा २ या बॉलिवूड चित्रपटात सर्वांना हसवाताना दिसेल.

आपण जाणून घेऊया की १७ वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘हंगामा’ चे दिग्दर्शनही प्रियदर्शन यांनी केले होते. परेश रावल, अक्षय खन्ना, रिमी सेन आणि आफताब शिवदासानी यांनी यात महत्वाच्या भूमिका केल्या. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला.