Take a fresh look at your lifestyle.

मी बॉलिवूडची पहिली ‘तापसी पन्नूच’,मी महिलांमधील आयुष्यमान खुराणा नव्हे…

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर अवॉर्डस सोहळ्यात समीक्षकांच्या पसंतीला उतरलेला अभिनेता म्हणून विकी कौशल तर अभिनेत्री म्हणून तापसी पन्नू हिला गौरवण्यात आलं. आयुष्यमान खुराणा याला आर्टिकल १५ साठी आणि तापसीला सांड की आँखसाठी हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार सोहळा झाल्यानंतर निर्माता तनुज गर्ग याने केलेल्या ट्विटमध्ये तापसीचं कौतुक करताना ‘महिलांमधील आयुष्यमान खुराणा’ असं लिहिलं होतं. याला तापसीने ट्विट करत उत्तर दिलं आहे.

तुमच्या स्तुतीबद्दल धन्यवाद, पण माझी तुलना त्याच्याशी करण्यापेक्षा ‘बॉलिवूडची पहिली तापसी पन्नू’ असं म्हणण्याचा सल्ला तापसीने दिला आहे. तनुजने तापसीच्या चित्रपटांची निवड ही आयुष्यमानप्रमाणेच असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. यावर एखाद्या स्त्रीचं मूल्यमापन पुरुषांच्या बरोबरीने करायची गरजच काय? स्त्रियांना स्वतःची ओळख आणि अस्तित्व आहेच की या भूमिकेतून तापसीने आपलं मत मांडलं आहे. याला उत्तर देताना तनुजने ‘ते तर आहेच’ म्हणत विषय थांबवला आहे. एकूणच चित्रपटांच्या कथानकासोबत खऱ्या जगण्यातील वागण्या बोलण्यातही पारदर्शीपणा ठेवणाऱ्या बॉलिवूडमधील कलाकारांच्या या भूमिकेचं कौतुक होत आहे.

 

Comments are closed.

%d bloggers like this: