मी काही भिकारी सिंगर नाही..; सोनू निगमने सांगितले इंडस्ट्रीपासून लांब जाण्याचे कारण
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय गायकांपैकी एक म्हणजे सोनू निगम. मात्र गेल्या अनेक काळापासून काही कारणांमुळे गायक सोनू निगम इंडस्ट्रीपासून दूर आहे. म्हणून सोनू निगमची गाणी विसरणे शक्य नाही किंवा तो गायला विसरला असेही नाही. तर याचे कारण म्हणजे सोनू निगम काही कामानिमित्त गेला बराच काळ दुबईत आहे. मात्र सोनूचे इंडस्ट्रीशी असलेले नाते अजूनही तितकेच घट्ट आहे. याचा प्रत्यय त्याने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीतून आलाय. इंडस्ट्रीपासून लांब का गेलास असे विचारताच सोनू निगमने आजकालच्या संगीत दिग्दर्शकांच्या कामाची पद्धत आवडत नाही असे स्पष्टपाने सांगितले आहे.
बॉलिवूडचा सर्वाधिक लोकप्रिय गायक सोनू निगम चित्रपटसृष्टीपासून लांब असला तरीही चालू मुद्दे आणि कार्यपद्धती यावर तो नेहमीच बोलताना दिसतो. पण दुबईत स्थायिक झाल्यापासून तो मुंबईत दिसलाच नाही. जणू दुबई हेच त्याचं घर बनलं आहे. पण चर्चेत राहणं कुणाला आवडत नाही. तसेच काहीसे सोनू निगमचे आहे. तूर्तास काय तर सोनू भडकला आहे. कुणावर? तर आजकालच्या संगीत दिग्दर्शकाच्या काम करण्याच्या पद्धतीवर. होय. सोनू निगमने संगीत दिग्दर्शकांच्या कामाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. बॉलिवूड हंगाम या वृत्त वाहिनीला मुलाखत देताना त्याने अक्षरशः आपला राग व्यक्त केला आहे.
View this post on Instagram
‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या एका ताज्या मुलाखतीत गायक सोनू निगम म्हणाला कि, कोणताही प्रोजेक्ट मिळवण्यासाठी मला ऑडिशन देणं ही गोष्ट अजिबातच मान्य नाही. कारण मी काही भिकारी सिंगर नाही. आजकाल म्युझिक डायरेक्टर एकच गाणं अनेक गायकांच्या आवाजात रेकॉर्ड करतात आणि नंतर प्रोड्यूसर, अॅक्टर व म्युझिक डायरेक्टर त्या गाण्याचे भविष्य ठरवतात. अरे..पण काय? मला असं वाटत कि कोणत्या सिंगरचं गाणं सिनेमात घ्यायचं, याचा निर्णय त्यांनी घेणे योग्य असले तरी हे काय स्वयंवर आहे का? त्यामुळे मला यात सामील होण्यात काहीही रस नाही. असे म्हणत सोनू निगमने आपला संताप व्यक्त केला आहे.