हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर यांनी अलीकडेच एकमेकांसोबत साताजन्माची लग्नगाठ बांधली आहे. यानंतर त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे हे लग्न चांगल चर्चेत राहील. फरहान- शिबानी यांनी अख्तर यांच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर लग्न केले. यानंतर फरहानची पूर्व पत्नी अधुना भाबानी हीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. यात तिने “मी त्यांना ब्लॉक करेन”, असं म्हटलंय. त्यामुळे ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
फरहानची पूर्व पत्नी अनुधा भाबानी हिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ट्रॉलर गँगला कडक इशारा दिला आहे. यात अनुधाने लिहिले आहे की, “हॅन्सअप ट्रोलर्स… जे कुणी मला ट्रोल करत आहेत. त्यांना मी ब्लॉक करेन”. “माझ्या विरोधात निगेटिव्ह लिहिणाऱ्यांना इथे स्थान नाही. अश्या लोकांना ब्लॉक केलं जाईल” असं अनुधाने इन्स्टा पोस्टमध्ये लिहिलं आहे. तिच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अभिनेता फरहान अख्तर हा नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेत राहिला आहे. फरहानने २००० सालामध्ये अधुना भाबानीसोबत लग्न केलं होतं. हे फरहानचं पहिलं लग्न होत. पुढे फरहान आणि अधुना यांना दोन मुलेही झालं. मात्र वैयक्तिक कारणांमुळे पुढे २०१७ सालामध्ये फरहान आणि अधुना एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांचा घटस्फोट झाला आणि ते विभक्त झाले. फरहान आणि अधुना यांच्यात झालेल्या घटस्फोटाचे कारण म्हणजे फरहानचे विवाहबाह्य संबंध असे चर्चेत होते.
Discussion about this post