Take a fresh look at your lifestyle.

लाॅकडाउनमध्ये ‘ही’ अभिनेत्री युट्यूबवरुन देतेय मुंबईतील घडामोडींचे अपडेट्स

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । सध्या भारतभरात संचारबंदीमुळे सर्व जण घरामध्ये बसून आहेत. चित्रपट, मालिका यांचे शूटिंग बंद आहे तसेच मालिकांचे जुने भाग पुप्रक्षेपीत केले जात आहेत. काही सेलिब्रिटी मात्र विविध व्हिडीओ बनवून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. सोबत मुंबईतील घडामोडींचे अपडेट्स देते आहे. असे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत. आर्या वोरा या अभिनेत्रीने स्वतःचे यु ट्यूब चॅनेल सुरु केले आहे. यातून ती मुंबईचे व्हिडीओ करून प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे.

आर्या वोराने सुरु केलेल्या या चॅनेलवर ती सध्या मुंबईची काय परिस्थिती आहे. हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. त्यामुळे कंटाळलेल्या प्रत्येकाला थोडा विरंगुळा मिळतो आहे. तिच्या या यु ट्यूब चॅनेल ला तिच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शविली आहे. सध्या मुंबईचे वातावरण कसे आहे तसेच मुंबईत काय सुरु आहे याचे व्हिडीओ ती बनवते आहे. तिने एक-दीड महिन्यापूर्वी हे चॅनेल सुरु केले आहे.

देवो के देव महादेव या मालिकेमुळे आर्या लोकांना माहित झाली होती. आर्या ही उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच फॅशन, लाइफस्टाइल ब्लॉग्ससाठी प्रसिध्द आहे. “लॉकडाऊनमध्ये प्रत्येकजण मनोरंजनासाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहेत.  “मला माझ्या अनेक चाहत्यांनी यु ट्यूब चॅनेल सुरु करण्यास सांगितले होते. शेवटी मी माझे स्वत:चे युट्यूब चॅनल घेऊन आले आहे.  चॅनलची सुरूवात एक-दिड महिन्यापूर्वीच झाली आहे.  पण रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे”, असे आर्याने सांगितले.