Take a fresh look at your lifestyle.

शुभमंगल सावधान! Indian Idol 12 फेम सायली कांबळे अडकली विवाह बंधनात

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी इंटरटेनमेंटवरील अत्यंत गाजलेला आणि अत्यंत प्रसिद्ध असलेला सिंगिंग रिऍलिटी शो इंडियन आयडल नेहमीच चर्चेत असतो. इतकेच काय तर आतापर्यंत इंडियन आयडलचे जितके सीजन झाले आहेत. त्यातील प्रत्येक सिजनमध्ये सहभागी झालेले स्पर्धक हे कायमस्वरूपी प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. यातील इंडियन आयडल सीजन १२ ची गोड गळ्याची स्पर्धक सायली कांबळे हि तुमच्या लक्षात असेलच.

तर तुमची लाडकी सायली आता मिस नव्हे तर मिसेस झाली आहे. होय. सायलीचा नुकताच विवाहसोहळा संपन्न झाला असून तिने या सोहळ्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सायलीने तिचा बॉयफ्रेंड धवलसोबत लग्नगाठ बांधली आहे.

सध्या सायलीच्या साखरपुड्यापासून अगदी मेहंदी, हळदी आणि लग्न सोहळ्याचे एकापेक्षा एक पोट आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे सर्वत्र नवरीबाईच्या लूकची जोरदार चर्चा आहे. नवरीच्या रुपात सायली अतिशय सुंदर दिसत आहे. सायली आणि धवल गेली अनेक अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते.

यानंतर अखेर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि आता तो दिवस स्वप्नातून सत्यात अवतरला आहे. सायली कांबळेने सप्टेंबर २०२१ मध्ये बॉयफ्रेंड धवलसोबत एक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर तिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरलसुद्धा झाली होती.

सायली आणि धवल यांनी साताजन्मासाठी एकमेकांनाचा हात घट्ट धरला आहे. या व्हायरल होणाऱ्या फोटोत सायलीच्या चेहऱ्यावर अतिशय सुंदर हसू आणि आनंद झळकताना दिसतोय. सध्या या व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडिओवर तिचे चाहते आणि अन्य नेटकरी शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत. या व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये सायली अतिशय सुंदर दिसत आहे.

सायली आणि धवलने मराठमोळ्या हिंदू रीती रिवाजानुसार लग्न केले. रविवारी २४ एप्रिल २०२२ रोजी रॉयल गार्डन रिसॉर्टच्या बँक्वेटमध्ये हा लग्न सोहळा नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. सायलीच्या लग्नात तिचे मित्र मंडळी यांसह इंडियन आयडल १२ चे काही स्पर्धकदेखील उपस्थित होते. सध्या सोशल मीडियावर सायलीच्या लग्नाचे फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.