Take a fresh look at your lifestyle.

बेजबाबदार पत्रकारिता! राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात उमेश कामतचा संबंध?; अभिनेत्याने व्यक्त केला संताप

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून राज कुंद्रा हे नाव चांगलेच चर्चेत आहे. त्याचे कारण असे कि अश्लील चित्रपट निर्मिती आणि प्रसारण या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली असून तो शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योजक आहे. न्यायालयाकडून त्याला शुक्रवारपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास फेब्रुवारी २०२१ पासून करत आहेत. यात राजसह आणखीही काही लोकांची नावं आली आहेत त्यात एक नाव होतं उमेश कामत आणि या नावावरून हिंदी प्रसार वाहिन्यांनी मराठी अभिनेता उमेश कामतचे फोटो बातम्यांना लावायला सुरूवात केली आहे. याची माहिती खुद्द उमेशनेच दिली आहे आणि आपला संताप व्यक्त केला आहे. यात आजतक या आघाडीवरील हिंदी वृत्त वाहिनीने राज कुंद्रा आणि त्याचा भागीदार उमेश कामत यांच्यातील संभाषण दाखवताना मराठी अभिनेता उमेश कामतचा फोटो वापरल्यामुळे त्याला नाहक त्रास सहन करावा लागला.

मराठमोळा अभिनेता उमेश कामत कुणाला माहित नाही. त्याचा चेहरा मोहरा आपण सारेच जाणतो. आजवर त्याने अनेक उत्तम नाटकं, मालिका आणि कित्येक चित्रपट सिनेसृष्टीला दिले आहेत. इतकेच काय तर, सध्या ‘अजूनही बरसात आहे’ ही त्याची नवीकोरी मालिका मराठी वाहिनी सोनी टीव्हीवर चालते. हेपण कमी असेल तर गुगलवर उमेश कामत असं नाव टाईप केल्यानंतर आपल्यासमोर उमेशचे एकापेक्षा एक फोटो येतात. त्यामुळे नामसाधर्म्यामुळे हा गोंधळ झाला आहे. पण कितीही चूक झाली हे मान्य केले, तरी माध्यमांनी फोटो देताना खातरजमा करायला हवी, असे उमेशचे स्पष्ट मत आहे.

त्यामुळे उमेश कामतने सोशल मीडियाचा आधार घेऊन या चुकीचे पुरावे देत आपली नाराजी व्यक्त केली आहे. उमेशने आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि अगदी ट्विटर पोस्टमध्ये या सर्व प्रकाराचा जाहीर निषेध केला आहे. त्याने त्याचा फोटो टीव्हीवर दाखवला जात असतानाचे काही स्क्रीन शॉट्सही या पोस्टमध्ये शेअर केले आहेत. शिवाय, या प्रकाराने उमेशची जी काही नाहक बदनामी झाली आहे, त्याबद्दल कायदेशीर कारवाई करू असा इशाराही त्याने या पोस्टमध्ये स्पष्टपणे दिला आहे.

सूत्रानुसार, राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली असून तो शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योजक आहे. राजचे नातेवाईक प्रकाश बक्षी इंग्लंडमध्ये राहतात. तिथे त्यांची केनरिन नावाची कंपनी आहे. त्या कंपनीचे ते चेअरमन असून राज कुंद्रा भागीदार आहे. या कंपनीला अश्लील चित्रपट निर्मितीसाठी राज पैसे पुरवीत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तर उमेश कामत हा राजचा माजी पीए आहे. तर केनरिन प्रॉडक्शन हाऊसचे भारतातील काम उमेश कामत पाहात होता.