Take a fresh look at your lifestyle.

इरफान ची फिल्म ‘अंग्रेजी मीडियम’ दिल्ली, केरळ आणि जम्मू-काश्मीर वगळता देशभरात प्रदर्शित

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । इरफान बऱ्याच दिवसानंतर चाहत्यांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा अंग्रेजी मीडियम हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. या चित्रपटात इरफानसोबत राधिका मदन, करीना कपूर खान, डिंपल कपाडिया, दीपक डोबरियाल, पंकज त्रिपाठी आणि किकू शारदा महत्वाच्या भूमिकेत आहेत. अंग्रेजी मीडियम हा वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे. आपल्या मुलीचे परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडील कसा संघर्ष करतात. दिल्ली, केरळ आणि जम्मू-काश्मीर वगळता अंग्रेजी मीडियम देशभरात रिलीज झाला आहे.

देशभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ३१ मार्चपर्यंत दिल्ली, केरळ आणि जम्मू-काश्मीरमध्ये चित्रपटगृह बंद आहेत. राज्य सरकारांनी लोकांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. या शहरांमध्ये १ एप्रिल २०२० रोजी थिएटर उघडल्यानंतर निर्माते पुन्हा हा चित्रपट प्रदर्शित करतील.


View this post on Instagram

 

OFFICIAL statement from #PVR…

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh) on Mar 12, 2020 at 8:50am PDT

 

अंग्रेजी मीडियम हा समीक्षकांना खूपच आवडला. आशा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांना हसवेल आणि मने जिंकेल. दुबईमध्ये ‘अंग्रेजी मीडियम’ लोकांना खूप आवडला आहे. कोरोना विषाणूचा या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम होईल.

इरफान २ वर्षानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. २०१८ मध्ये त्याला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरचा त्रास झाला. तो न्यूयॉर्क येथे उपचारासाठी गेला होता. उपचार घेत परत आलेला इरफान पूर्णपणे बरा झाला नाही ज्यामुळे त्याने चित्रपटाची जाहिरातदेखील केली नाही. होमी अदजानिया यांनी अंग्रेजी मीडियम दिग्दर्शित केला आहे.