Take a fresh look at your lifestyle.

‘इंग्लिश मीडियम’ चे दुसरे गाणे ‘नचन नु जी करदा’ रिलीज,राधिका मदान दिसली मजा करताना

हॅलो बॉलिवूड ऑनलाइन । इरफान खान ‘इंग्लिश मीडियम’ या चित्रपटातून बरीच काळानंतर पुनरागमन करीत आहे. प्रत्येकजण इंग्रजी मिडीयम या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. लोकांना ट्रेलर खूप आवडला आहे.आता ‘इंग्लिश मीडियम’चे दुसरे गाणे ‘नाचन नु दिल करदा’ रिलीज झाले आहे. गाण्यात राधिका मदान मजेदार स्टाईलमध्ये नाचताना दिसत आहे.

‘नचन नू जी करदा’ हे गाणे एका पंजाबी गाण्याचे रिमेक आहे. रिमेक रोम आणि निखिता गांधी यांनी गायले असून तनिष्क बागची यांनी संगीत दिले आहे.

‘नचन नू जी करदा’ या गाण्यात ती लंडनमधील युनिव्हर्सिटीमध्ये मजेदार डान्स करताना दिसत आहे. विद्यापीठाच्या उर्वरित मुलांसमवेतही ती नाचते. राधिकाने हे गाणे शेअर करताना लिहिले – लहानपणापासून आतापर्यंत माझ्यात असलेली सगळी बॉलीवूडगिरी मी या गाण्यात टाकली आहे.

 

इंग्रजी मिडीयम विषयी बोलायचे झाल्यास ती एका वडील-मुलीची गोष्ट आहे. आपल्या मुलीचे लंडनला जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडील सर्व काही करतात.

 

Comments are closed.