Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

दगडूला मिळाली का खऱ्या आयुष्यातली प्राजू..?; फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 27, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Prathamesh_Kshitija
0
SHARES
200
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास’ चित्रपटातून संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेला अभिनेता प्रथमेश परब अर्थात आपला लाडका दगडू प्रेमात पडलाय. तास तो अनेकदा प्रेमात पडलाय अशा चर्चा आपण ऐकल्या असतील. पण यावेळी तो पक्का रिलेशनशिपमध्ये आहे असं बोललं जातंय. याच कारण आहे दिवाळी. हो हो दिवाळी. कारण दिवाळीच्या निमित्ताने प्रथमेशने त्याच्या आयुष्यातील तिच्या सोबत एक खास फोटोशूट केलं आहे आणि शेअरसुद्धा केलं आहे. यामुळे तो आणि ती रिलेशनशिप मध्ये असून दगडूला खऱ्याखुऱ्या आयुष्यात प्राजु मिळाली आहे अशी चर्चा जोरदार रंगली आहे.

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

प्रथमेशची प्रेयसी कोण..? असे अनेकदा विचारूनही कधी त्याने उत्तर दिलं नाही. पण यंदा दिवाळीतील त्याच हे फोटोशूट बरंच काही बोलून जात आहे एव्हढं नक्की. प्रथमेशने शेअर केलेलं हे दिवाळीतील खास फोटोशूट त्याने क्षितिजा घोसाळकरसोबत केले आहे. क्षितिजा आणि तो खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. चांगले मित्र मैत्रीणदेखील आहेत. शिवाय टाईमपास ३ च्या प्रीमिअरवेळी तिची उपस्थिती काही वेगळेच संकेत देऊन गेली. यामुळे प्रथमेश आणि क्षितिजा रिलेशनमध्ये आहेत असे सगळ्यांना वाटत आहे. शिवाय हे फोटो शेअर करताना क्षितिजाने एक अतिशय सुंदर कॅप्शन लिहिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Kshitija Ghosalkar (@miles_in_style)

तिने लिहिलंय कि, ‘भारतीय संस्कृती आणि सण कसले भारी आहेत राव! म्हणजे रोजच्या धकाधकीच्या जीवनात , घडाळयाच्या काट्यानुसार धावणाऱ्या आपल्या सर्वांनाच, एका क्षणात pause करून एकत्र आणतात. आपल्या busy schedule मधून वेळ काढून त्यांचं celebration करवून घेतात☺️ एखादं लहान बाळ कसं आईकडे हट्ट करून आपले लाड पुरवून घेतं, अगदी तसेच आणि त्यातून दिवाळी म्हटली की ती “साजरी” करणं कोणाला बरं नाही आवडत?? पण to be very honest, आजकाल ती साजरी करण्याची व्याख्याचं पार बदलून गेली आहे. फराळ बनवणं, रांगोळी काढणं, घर सजवणं, दिव्यांची आरास करणं हे फक्त एक निमित्त असतं….. एकत्र येण्याचं.

View this post on Instagram

A post shared by Kshitija Ghosalkar (@miles_in_style)

आईला फराळ बनवायला मदत करतांना तिच्यासोबत किचनमध्ये 2, 3 तास घालवल्यावर ती आपल्यासाठी दररोज घेत असलेल्या कष्टांची जाणीव होते. रांगोळी काढताना जितका विचार करून आपण तिच्यात रंग भरतो आणि मन लावून ठिपके जोडतो, प्रत्येक नात्यात तितकंच मन लावून रंग भरता यायला हवेत. घर सजवताना किंवा त्याची साफसफाई करताना, कधीकधी अचानक जुन्या गोष्टी सापडतात आणि आठवणींच्या अल्बम मध्ये नकळत आपल्याला घेऊन जातात, हो ना? दिव्यांची आरास जितक्या प्रेमाने आणि कौतुकाने आपण करतो तितकच प्रेम आणि कौतुक नात्यांचं देखील असावं म्हणजे आयुष्य दिव्याच्या प्रकाशासारखं उजळून निघतं. थोडक्यात काय, निमित्त जरी दिवाळीचं असलं तरीदेखील नात्यांचं साजरं होणं महत्वाचं!

Tags: Instagram PostKshitija GhosalkarPrathmesh ParabRelationshipViral PhotoshootViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group