Take a fresh look at your lifestyle.

कोणाच्याही मृत्यूला गर्लफ्रेंड किंवा Ex ला दोषी ठरवणे चुकीचे – सोनम कपूर

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा मृतदेह रविवारी दुपारी त्यांच्या वांद्रा येथील घरी आढळून आला. प्राथमिक तपासणीत त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हंटले जात आहे. सुशांत सिंग यांच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी यावर दुःख व्यक्त केले आहे. तर त्यांच्या जाण्याने ते नैराश्यात असल्याकारणाने त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हंटले जात आहे. सुशांत सिंग यांच्या नैराश्याचे कारण सोशल मीडियावर तसेच माध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनले आहे. यामध्ये अनेक मुद्दे समोर आले आहेत. यावर अभिनेत्री सोनम कपूर अहुजा आता बोलती झाली आहे.

सुशांत सिंग यांच्या मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या दिशा सॅलियन हिने मागच्या आठवड्यात आत्महत्या केली होती. ती त्यांच्या खूप जवळची व्यक्ती होती असे म्हंटले जाते आहे. तसेच त्यांच्या प्रेयसीचे काही टेन्शन असेल असे म्हंटले जात आहे. सुशांत सिंग यांच्या आयुष्यावर अनेक चर्चाना उधाण आले आहे. तर काहींनी बॉलिवूडमध्ये त्यांना दुर्लक्षित केल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असे म्हंटले आहे. यावर आता अभिनेत्री सोनम कपूर अहुजा हिने एखाद्याच्या मृत्यूवर त्याच्या आधीच्या प्रेयसीला, आताच्या प्रेयसीला, सहकारी, कुटुंब यांना दोष देणे म्हणजे अज्ञानीपणाचे आणि उत्तेजित होण्याचे लक्षण आहे.

दरम्यान, सुशांतसिंग यांच्या पार्थिवावर आज अंतिम संस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्ट मध्ये श्वास कोंडल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहेत. तपशीलवार रिपोर्ट पुढील १० – १५ दिवसात मिळेल अशी माहिती समोर आली आहे. त्यांचा मृत्यू हा आत्महत्या नसून त्यांची हत्या केली गेली आहे असे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे असून त्यांनी याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच पुन्हा एकदा बॉलिवूडमशील नेपोटीझम च्या चर्चाना उधाण आले आहे.