Take a fresh look at your lifestyle.

शाळेत जाण्यापासून वाचण्यासाठी जॅकीदादा करत असे टायगरला मदत,एका मुलाखतीत त्याने उघड केले गुपित

हॅलो बॉलिवूड ऑनलाइन ।  टायगर श्रॉफ आजकाल त्याच्या आगामी ‘बागी ३’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर, रितेश देशमुख आणि अंकिता लोखंडे टायगर सोबत महत्वाच्या भूमिका साकारताना दिसतील. टायगरसाठी हा चित्रपट विशेष ठरणार आहे कारण तो आपल्या वडिलांसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. बागी ३ मध्ये जॅकी श्रॉफ टायगरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. टायगरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की कसे त्याच्या वडिलांनी त्याला शाळेत जाण्यापासून वाचवले.

टायगरला त्याचे वडील जॅकी श्रॉफ यांच्या जादूच्या झप्पीने बर्‍याच वेळा शाळेत जाण्यापासून वाचवले आहे. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत टायगर म्हणाला, “मी माझ्या पालकांना कधीच काही विचारलं नाही, पण जेव्हा जेव्हा मला शाळेत जाण्याचे मन नसायचे तेव्हा मी सकाळी उठून दादांना मिठी मारायचो.” यानंतर आईने मला बेडवरुन उचलण्याचा प्रयत्न करायची,तेव्हा मी जोराने दादांना मिठी मारायचो. तो मला खूप आधार वाटायचा आणि आईला सांगायचा की मला घरीच राहू द्या. पापा म्हणायचे – सोडून दे ना, राहू देत, त्याला नाही जायचे.

टायगरने पुढे सांगितले की वडिलांच्या मदतीने मी बर्‍याच गोष्टी टाळत असे. जेव्हा जेव्हा मी संकटात पडायचो तेव्हा मी त्यांच्याकडे लगेच जात असे आणि ते मला वाचव्हायचे. ते माझे हिरो होते आणि आहे. टायगरने त्याच्या पालकांना नवीन घर भेट म्हणून दिले आहे. तो म्हणाला- माझ्या पालकांनी मला सर्वात चांगले बालपण दिले आहे आणि त्यांच्यासाठी ही माझी लहान भेट आहे. माझ्या आईला नेहमीच तिच्या नावाने घर हवे होते, म्हणून मी हे घर तिच्यासाठी विकत घेतले.”बागी ३” बद्दल बोलायचे झाल्यास हा चित्रपट ६ मार्च २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले आहे.

Comments are closed.

%d bloggers like this: