Take a fresh look at your lifestyle.

जॅकलिनने पोस्ट करत म्हंटले,”प्राणी संग्रहालयात बंद असलेल्या प्राण्यांच्या वेदना…

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । कोरोनाव्हायरसमुळे,जिथे आज संपूर्ण देश त्यांच्या घरात बंद आहे. त्याचवेळी नुकतीच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने एक फोटो शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खरं तर, प्राणी संग्रहालयामध्ये बंद असलेल्या प्राण्यांच्या वेदना व्यक्त करण्यासाठी अभिनेत्री जॅकलिनने पांडाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक पांडा पिंजऱ्यात बसला आहे. फोटोमध्ये लिहिलं आहे,”आता आपल्याला हे कळेल की प्राणीसंग्रहालयात प्राण्यांना कसे वाटते.” जॅकलिन फर्नांडिसची पोस्ट खूप व्हायरल होत आहे.


View this post on Instagram

 

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on Mar 23, 2020 at 12:47am PDT

 

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने या पोस्टची तुलना पिंजऱ्यात बंद असलेल्या प्राण्यांची आणि कोरोनाव्हायरसच्या भीतीने लोकांच्या घरात बसलेल्या लोकांची केली आहे.त्याच वेळी,पिंजऱ्यामध्ये बंदिस्त होऊन प्राण्यांना खरोखर कसे वाटते याची आठवण करून देण्याचा प्रयत्न ती करीत आहेत. अभिनेत्रीच्या या पोस्टवर लोक बरीच कमेंट करत आहेत आणि त्यांचा अभिप्राय देत आहेत.

कोरोनाव्हायरसमुळे भारतात आतापर्यंत ७ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, संक्रमित लोकांची संख्या वाढून एकूण ४१५ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, रविवारी कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूची एक घटना गुजरात, बिहार आणि महाराष्ट्रात नोंदली गेली आहे. यापूर्वी कर्नाटक, दिल्ली, महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला.