Take a fresh look at your lifestyle.

श्रीदेवीच्या आठवणीने भावूक झाली जान्हवी,लिहिले- मला तुझी रोज आठवण येते…!!!

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । श्रीदेवी यांच्या आकस्मिक निधनाने लोकांना धक्का दिला. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी श्रीदेवीने हे जगाचा कायमचा निरोप घेतला. त्या दिवसाला आज २ वर्षे पूर्ण झाली आहेत. भारताची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी दुबईमध्ये पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी कपूरसोबत एका कौटुंबिक विवाहात सहभागी होण्यासाठी गेली होती. जान्हवी कपूर लग्नाला येऊ शकली नव्हती, कारण ती येथे ‘धडक’च्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. श्रीदेवीच्या निधनानंतर दोन वर्षांनी अभिनेत्री जान्हवी कपूरने आईसोबत एक चित्र शेअर करुन तिला श्रद्धांजली वाहिली.


View this post on Instagram

Miss you everyday

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on Feb 23, 2020 at 12:02pm PST

 

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने सांगितले की ती अद्यापही या धक्क्यातून सावरु शकलेली नाही.


View this post on Instagram

My angel 💕

A post shared by Sridevi Kapoor (@sridevi.kapoor) on Aug 1, 2017 at 3:34pm PDT

 

जान्हवी बर्‍याचदा तिच्या आईच्या साडीमध्ये दिसली. तिच्या लूकची तुलना नेहमीच आई श्रीदेवीशी केली जाते.

जान्हवी कपूर-श्रीदेवी

सध्या जान्हवी कपूर गुंजन सक्सेनाच्या बायोपिकचे शूटिंग करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा करत आहे. जान्हवी या चित्रपटात सूर्य चक्राने गौरविण्यात आलेल्या लढाऊ पायलट गुंजन सक्सेनाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात जान्हवी कपूरसह पंकज त्रिपाठी देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.गुंजन सक्सेना: कारगिल गर्ल हा चित्रपट येत्या २४ एप्रिलला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

 

 

Comments are closed.

%d bloggers like this: