Take a fresh look at your lifestyle.

‘झुंड’चा कुतूहल वाढवणारा फर्स्ट लुक पहा; सुपरस्टार बच्चन आणि सुपरहिट अण्णा पहिल्यांदाच एकत्र !

उद्या टीजर रिलीज होणार !

सोशल कट्टा । फक्त महाराष्ट्रातल्या मातीतला म्हणून नव्हे, तर वेगळं काहीतरी आजूबाजूच्या माणसांच्या गोष्टी सांगणारा दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाविषयी अख्ख्या महाराष्ट्राला आणि खुद्द सुपरस्टार अमिताभ बच्चन मुख्य आणि वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याने अख्खा भारत या चित्रपटाची वाट पाहतोय. आणखी एक कारण हे ही आहे कि अमिताभ हा नागराजचा लहानपणापासूनच सर्वात आवडता नट आहे.

हा चित्रपट बच्चन यांच्या करिअर मधीलआणखी एक मैलाचा दगड ठरेल का ?

 नागराज त्यांची जादू हिंदीतहीकायम ठेवू शकतील का?

नागराज सलग पाचव्या चित्रपटातहीराष्ट्रीय अवॉर्ड घेणार का?

अजय अतुल आणि नागराजसैराटची जादू पुन्हा करू शकतील का ?

या आधी शूटिंगचे आणि वादांची बरीच चर्चा आणि फोटोज बाहेर आल्यानंतर, अमिताभ बच्चन स्टारर ‘झुंड’ च्या निर्मात्यांनी आता अधिकृत फर्स्ट लूक पोस्टरचे अनावरण केले आहे आणि आपणा सर्वांनाच कुतुहलात पाडले आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन यांनी आपल्या चाहत्यांसाठी चित्रपटाचे पहिले लूक पोस्टर शेअर केले. पोस्टरमध्ये अमिताभ आपल्या पाठमोरे उभे दिसत आहेत. निळ्या रंगाचा पोशाख घालून बच्चन, झोपडपट्टीची वस्ती आणि पडलेल्या फुटबॉलकडे पाहताना दिसत आहे.

‘झुंड’ हा चित्रपट स्लम सॉकरचा संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात बच्चन एक प्राध्यापकाची भूमिका साकारत आहेत जे रस्त्यावरच्या मुलांना प्रवृत्त करते आणि फुटबॉल संघ सुरू करतात. मराठी चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांनी ‘सैराट’ या त्यांच्या मेगाहिट चित्रपटाने भारतभर प्रसिद्धी मिळवली. आगामी बॉलिवूड चित्रपटासाठी अमिताभ पहिल्यांदा नागराजसमवेत काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे मंजुळे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.