Take a fresh look at your lifestyle.

के. एल. राहुल-आथियाचा फोटो व्हायरल…

चंदेरी दुनिया । बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रीकेटपटू के. एल राहुलच्या रिलेशनशिपची नेहमीच चर्चा सुरु असते. मात्र दोघांनी अद्याप उघडपणे यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पुन्हा या दोघांचे रिलेशनशिप असल्याचे समोर आले आहे. याचे कारण सोशल मीडियावरील पोस्ट आहे.

के एल राहुलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अथियासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत दोघे एका फोन बूथमध्ये दिसत आहेत. फोटो शेअर करताना के. एल. राहुलने ‘हॅलो, देवी प्रसाद’ असे कॅप्शन दिले आहे.


अथिया फोटोमध्ये हसताना दिसत आहे. तर के. एल. राहुलचा चेहरा गंभीर दिसत आहे. त्यांच्या या फोटोवर क्रिकेटर हार्दिक पंड्याने कमेंट करत म्हटले, टू क्‍यूटीज. या फोटोवर अथियाचे वडील आणि बॉलिवूड स्टार अभिनेता सुनील शेट्टीनेही लाफिंग इमोजीसह कमेंट केली आहे. के. एल. राहुलच्या या पोस्टवर त्याचे चाहतेही वेगवेगळ्या कमेंटर करत आहेत. विशेष म्हणजे या फोटोवर अथियाचा लहान भाऊ अहान शेट्टीनेही कमेंट केली आहे.

के. एल. राहुलच्या पोस्टनंतर आता पुन्हा या दोघांच्या रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. आता यावर हे दोघेही काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, अथिया ‘मोतीचूर चकनाचूर’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत झळकली होती.