Take a fresh look at your lifestyle.

काजोलची मुलगी न्यासाचा पारंपारिक लुक बनली हेडलाईन, फोटो शेअर करुन अभिनेत्रीने म्हंटले,”या भीतीच्या वातावरणातही…”

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री काजोल सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडिया वरून शेअर करून, चाहत्यांमध्ये धमाल उडवून लावते. अलीकडेच या अभिनेत्रीने आपली मुलगी न्यासा देवगणची काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत, ज्यात तिचा लूक पाहण्यासारखा आहे. या फोटोंमध्ये न्यासा पारंपारिक स्टाईलमध्ये दिसत आहे. गोल्डन कलरच्या लेहेंगामध्ये न्यासा सुंदर दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना काजोलने एक कॅप्शनही लिहिले असून जे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

 

काजोलने न्यासा देवगणचे हे फोटो शेअर केले आहेत, “या भीतीच्या वातावरणा वेळी आम्हाला आनंदाचे औषध हवे आहे. माझी असल्याबद्दल धन्यवाद.” फोटोमध्ये न्यासा देवगनचा पारंपारिक लूक बऱ्यापैकी नेत्रदीपक दिसत आहे. तिच्या या फोटोवर कमेंट करताना अभिनेत्री तनिषा मुखर्जी यांनी लिहिले की, “माझी राजकुमारी.” न्यासा देवगनचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, त्याचबरोबर लोकही यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. काजोलने न्यासाच्या ट्रोल होण्याबद्दल मत व्यक्त केले आहे.एका मुलाखतीत काजोलने पिंकविलाला सांगितले की जेव्हा जेव्हा तिला ट्रोल केले जाते तेव्हा मला खूप वाईट वाटते.

काजोलबद्दल बोलायचे तर,ही अभिनेत्री अखेरची अजय देवगण सोबत ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात काजोल व्यतिरिक्त सैफ अली खान देखील मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत, तर बॉक्स ऑफिसवरही मोठा दणका उडविला. याशिवाय नुकतीच अभिनेत्री ‘देवी’ या शॉर्ट फिल्ममध्येही दिसली आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये काजोल व्यतिरिक्त श्रुति हासन, नेहा धूपिया, मुक्ता बर्वे, नीना कुलकर्णी, शिवानी रघुवंशी आणि यशस्विनी डायमा या ९ अभिनेत्री दिसल्या आहेत.