Take a fresh look at your lifestyle.

कामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर !

संजय मिश्रा यांच्या आजवरच्या सर्वोत्तम अभिनयाला साईड ऍक्टर्स आणि दिग्दर्शकाची मजबूत साथ

मुव्ही रिव्ह्यू । हा चित्रपट मोठ्या कलाकाराला घेऊन चित्रपट हिट करता आला असता, पण दिग्दर्शकाने खऱ्या आयुष्यातील साईड अक्टर्स ना घेऊन हा चित्रपट बनवण्याचा खूप मोठा निर्णय घेतला आणि तिथेच तो जिंकला. हा चित्रपट हाउसफुल चा बोर्ड लावणार नाही कदाचित, पण चित्रपट रसिकांचं मन भरून टाकेल.

   लेखक-दिग्दर्शक हार्दिक मेहता यांचा ‘कामयाब’ बॉलिवूडमधील सहकलाकार म्हणून रिटायर्ड झालेल्या सुधीर या पात्राभोवती फिरतो. एका मुलाखतीत मुंबईतील त्याच्या घरात एक मुलाखत होते. तेव्हा आत्तापर्यंत त्याने ४९९ चित्रपटात काम केले आहे, हे ऐकून त्याला वाटते कि आणखी एक चित्रपट तरी केला पाहिजे जेणेकरून काहीतरी केलंय आयुष्यात असं वाटेल. आणि तिथून गोष्टीचा प्रवास सुरु होतो. त्याला किमान ५०० व चित्रपट करायचा आहे. चित्रपटातल्या गोष्टी वास्तविक भासतात.

   चित्रपटात साध्या आणि गहन असलेल्या पहिल्या दृश्यापासूनच, इतकी वर्ष अनेक छोटी पात्र निभावणाऱ्या कलाकाराचे आयुष्य काय आहे हे दर्शविण्यास सक्षम आहे. वरचेवर त्याला रस्त्यावर ओळख मिळते पण त्याचे नाव कोणालाही माहित नाही. ५०० व्या चित्रपटाच्या प्रवासादरम्यान, आपल्याला बॉलिवूडमधील मधील स्पर्धात्मक आणि निर्दय जगाबद्दल नवीन दृष्टीकोन मिळतो. या चित्रपटातील मुख्य नायकाची भूमिका साकारणारे संजय मिश्रा यांच्या शब्दांत ते “हर किस्से के हिस्से” आहेत

   कामयाब चित्रपटाचे अनेक खांब आहेत ज्यावर तो खंबीर उभा आहे. पहिला म्हणजे संजय मिश्रा यांच्या सोबतच आणि दीपक डोब्रियाल आणि ईशा तलवार यांचा सर्वसमर्थ अभिनय. दुसरा या चित्रपटाचा वेगळा विषय. नवखा असलेला हार्दिक मेहता यानं पहिल्या वाहिल्या चित्रपटात दिग्दर्शनाची छाप सोडले. कॅरेक्टर अक्टर्स चा त्याचा बारीक अभ्यास दिसून येतो. हे असे जग आहे जेथे संयम ठेवण्यास जागा नसते आणि खेळात टिकून राहणे आवश्यक असते. योग्य वेळी योग्य निवडी करणे ज्यामुळे एखाद्याला टिकून राहण्यास मदत होते.

   “ये पुराना चावल से रिसोट्टो बनाना मुश्किल है,” असे म्हणत का होईना अखेर कास्टिंग डिरेक्टर दीपक डोब्रियाल सुधीर च स्वप्न पूर्ण करतो आणि त्याला ५०० व रोल मिळवून देतो, पण चित्रपटाचा क्लायमॅक्स तुम्हाला भावनिक करतो तुमच्या मनाचा ठाव घेतो.

   दिग्दर्शक हार्दिक मेहता यांनी ‘ट्रॅपड’ या चित्रपटाची गोष्ट लिहिली आहे. क्वीन सारख्या चित्रपटात स्क्रिप्ट सुपरवायजिंग केलं आहे. ‘कामयाब’मध्ये अवतार गिल आणि दिवंगत विजू खोटे यांच्यासारख्या सुप्रसिद्ध व्यक्तिरेखा आहेत ज्यांनी चित्रपटाला वास्तविकतेचं रूप दिलं आहे. मध्यंतरानंतर चित्रपट थोडा स्लो वाटत असला तरी चित्रपटाचे गाभा तितकाच समृद्ध राहतो.

ऐका माझं, थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर आहे !

Comments are closed.

%d bloggers like this: