Take a fresh look at your lifestyle.

‘तिला’पण बलात्काऱ्यांसोबत जेलमध्ये ठेवा ! पहा कंगना राणावत एवढी कोणावर आणि का तापली ?

सोशल कट्टा | निर्भयावर झालेल्या अन्यायाविषयी, आणि तिच्या आईवर असलेल्या दुःखाची आम्हाला पूर्ण जाणीव आहे, तरीही त्यांनी सोनिया गांधी यांनी जशी राजीव गांधींच्या मर्यकारी नलीनीला माफ केलं होत तसं, तुम्हीही माफ करावं, आमचा फक्त मृत्युदंडाला विरोध आहे. असं ट्विट इंदिरा जयसिंग या वकिलांनी केली. त्यावर अभिनेत्री कंगना रणावतने टीकेची झोड उठवली आहे. पंगा या चित्रपटाच्या प्रीमियरवेळी कंगना बोलत होती.

     इंदिराज जयसिंह यांच्यावर राग व्यक्त करताना कंगना म्हणाली, ‘या महिलेला चार दिवस निर्भया प्रकणातील आरोपींसोबत तुरुंगात ठेवायला हवे. या कशा महिला आहेत ज्यांना बलात्कारातील आरोपींवर दया येते. अशा महिलांच्या पोटीच असे नराधम जन्म घेतात ज्यांना बलात्कारी आणि खून्यांप्रती प्रेम असते.’

इंदिरा जयसिंह यांच्या विधानानंतर निर्भयाच्या आईने त्यांना चांगलेच सुनावले होते. त्यांनी म्हटले होते की, ‘इंदिरा जयसिंह कोण आहेत, ज्या मला सल्ला देत आहेत. संपूर्ण देशाची इच्छा आहे की दोषींना फाशी दिली जावी. केवळ यांच्यासारख्या लोकांमुळेच बालत्कार पीडितांना न्याय मिळत नाही.’

Related image
Indira Jaising, 79