Take a fresh look at your lifestyle.

कंगनाला मिळाला शत्रुघ्न सिन्हाचा पाठिंबा ; कंगणाबद्दल म्हणाले की…..

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीच्या मुद्द्यावरून चांगलाच वाद पेटला आहे. सध्या अभिनेत्री कंगना रानौत वारंवार या वादग्रस्त मुद्द्यांवर भाष्य करताना दिसत आहे. घराणेशाहीचा मुद्दा पुढे करत तिने कलाविश्वात नव्याने येवू पाहणाऱ्या कलाकारांवर अन्याय होत असल्याचं वक्तव्य केलं. सुशांतने देखील बॉलिवूडमधील घराणेशाहीला बळी पडून आपलं जीवन संपवलं असल्याचं ती सोशल मिडियाच्या माध्यमातून वारंवार सांगत आहे.

कंगनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे अनेक कलाकारांनी तिचा विरोध देखील केला. मात्र अभिनेते व राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी कंगनाला पाठिंबा दिला आहे. एका मुलाखती दरम्यान त्यांनी कंगना  विषयी आपलं मत मांडलं आहे.

ते म्हणाले, ‘बॉलिवूडमध्ये कोणाच्याही आशीर्वादाशिवाय कंगनाने खूप यश संपादन केलंय.अनेक अडचणींचा सामना करत तीने बॉलिवूडमध्ये  आपले वर्चस्व प्रस्थापित केलं. आता देखील ती फार चांगलं काम करत आहे. तिचं हे यश पाहून लोकांना तिच्याविषयी ईर्षा वाटू लागली आहे. त्यामुळेच खूप लोक कंगनाच्या विरूद्ध बोलतात, किंबहुना ते कंगनाचा विरोध देखील करतात.’ असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

Comments are closed.