Take a fresh look at your lifestyle.

कंगनाची बहीण रंगोली चंदेल घेणार मुल दत्तक !!!

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । बॉलिवूड अभिनेत्री कंगना च्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे.तिची बहीण रंगोली चंदेल हि पुन्हा आई होणार आहे, परंतु यावेळी ती मुलीला दत्तक घेणार आहे.हि आनंदाची बातमी तिने सोशल मीडियाच्या मदतीने आपल्या चाहत्यांना दिली आहे. सोबत तिने शिल्पा शेट्टीच्या सरोगेसीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अलीकडेच शिल्पाने सरोगसीच्या मदतीने मुलीला जन्म दिल्याची घोषणा केली.

कंगना रनौतची बहीण रंगोली चंदेल ट्विटरवर म्हणाली, ‘मी आणि माझ्या पतीने एक मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला जोडप्यांना सरोगेसीऐवजी मूल दत्तक घेण्यास प्रोत्साहित करायचे आहे. या जगात आधीपासून असलेल्या मुलांना त्यांनी घरी आणलं पाहिजे. त्यांचे स्वप्नसुद्धा पूर्ण होऊ द्या, ज्यांना पालक बनण्याची इच्छा आहे.

 

रंगोली चंदेलने आणखी एक ट्विट केले की, ‘माझी बहिण कंगनाने आम्हाला असे करण्यास प्रेरित केले आहे. मी आणि अजयने सर्व औपचारिकता पूर्ण केल्या आहेत. मला आशा आहे की काही महिन्यांत आमच्याकडे आमची मुलगी येईल.कंगनाने तिचे नाव ‘गंगा’ ठेवले. एका अनाथ मुलाला घर दिले याचा आम्हाला खूप आनंद वाटत आहे’.

 

 

नुकतंच शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर मुलीचा हात धरून एक फोटो शेअर केला आहे आणि सरोगेसीच्या माध्यमातून ती पुन्हा आई झाल्याची माहिती तिने दिली.तिने आपल्या मुलीचे नाव समीशा शेट्टी कुंद्रा असे ठेवले आहे.

 

Comments are closed.

%d bloggers like this: