Take a fresh look at your lifestyle.

“पुन्हा हॉरर चित्रपट करणार नाही”, असं का म्हणाला करण जोहर ?

टीम, हॅलो बॉलीवूड । करण जोहर हे बॉलीवूडमधले प्रसिद्ध व्यवसायिक दिग्दर्शक आहेत. अलीकडेच नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या घोस्ट स्टोरीज प्रेक्षकांच्या हॉरर ड्रामा काही खास आवडला नाही. प्रेक्षकांनी चित्रपटाला नकारात्मक समीक्षा दिली. ‘लस्ट स्टोरीज’ या नेटफ्लिक्स चित्रपटाचे दिग्दर्शक झोया अख्तर, करण जोहर, दिवाकर बॅनर्जी, अनुराग कश्यप यांचा हा प्रोजेक्ट आहे. तथापि हॉरर स्टोरीला लस्ट स्टोरीजइतके यश मिळाले नाही.

घोस्ट स्टोरीजवर दिग्दर्शक करण जोहरने आज आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या शैलीतून बाहेर पडताना करण जोहरने प्रथम घोस्ट स्टोरीज या वेबसीरीजची एक कथा लिहिली. पण हा प्रयोग यशस्वी झाला नाही. एका मुलाखतीत करण जोहरने आपला अनुभव शेअर केला आणि मी पुन्हा कधीही भयपट चित्रपट बनवणार नाही असे सांगितले. करण म्हणाला की आपण भयपटात एकसंग होऊ शकत नाही आणि म्हणूनच तो अशा प्रकारच्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणार नाही.

पुढे करण म्हणाला की “घोस्ट स्टोरीज हा माझा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला पहिला आणि शेवटचा हॉरर चित्रपट आहे. घोस्ट स्टोरीज बनवणे माझ्यासाठी एक आव्हान होते. मला भयपट कथा पाहणे आवडत नाही आणि त्यासाठी मला माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावे लागेल.”