Take a fresh look at your lifestyle.

‘जनता कर्फ्यू’मध्ये करण जोहर,गीता बसरा,हरभजनसिंग यांनीही वाजवल्या टाळ्या

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । कोरोनाव्हायरसशी चाललेल्या लढाईमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘जनता कर्फ्यू’च्या दिवशी पाच वाजता पाच मिनिटांसाठी टाळ्यांचा कडकडाट आणि थाळी वाजवण्यास सांगितले होते आणि त्याचा उत्साह देशभरातील लोकांमध्येही दिसून आला. बॉलिवूड स्टार्सनीही यात भाग घेतला. तमन्ना भाटिया आणि लता मंगेशकर यांच्यानंतर करण जोहर, गीता बसरा आणि हरभजन सिंग यांचे व्हिडिओही समोर आले आहेत. व्हिडीओमध्ये या स्टार्सनी थाळी आणि टाळी वाजवून आपल्या हिरोंचा सन्मान केला आहे.

 

करण जोहर, गीता बसरा आणि हरभजन सिंग यांचा हा व्हिडिओ विरल भयानीने शेअर केला आहे. यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला होता. तमन्ना भाटियाचा हा व्हिडिओ ५० हजारांहून अधिक लोकांनी पाहिलेला आहे. त्यांच्या अगोदर, लता मंगेशकर यांनी ट्वीट करून लिहिले: ‘नमस्कार, ते सर्व डॉक्टर, परिचारिका, रुग्णालये आणि त्यांचे कर्मचारी, आमचे पोलिस, पालिका कर्मचारी आणि आपले सक्षम सरकार, त्यांची काळजी न घेता, आमचे सर्वांचे रक्षण करॅट आहेत. मी सर्वांचे आभार मानती आणि अभिवादन करते.

 

 

 

देशात कोरोनाव्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या वाढून ३१५ झाली आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे रुग्ण सर्वाधिक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ सुरू होण्यापूर्वी ट्विट केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले- “जनता कर्फ्यू सुरू होत आहे … मी सर्व नागरिकांना विनंती करतो की या देशव्यापी मोहिमेत सहभागी व्हावे आणि कोरोनाविरूद्धच्या लढा यशस्वी व्हावा. आमचे संयम व संकल्प या साथीला पराभूत करतील.” त्यांच्या या आवाहनाचा परिणाम संपूर्ण देशातही दिसून येतो. वाराणसी, कोलकाता, हैदराबाद, बेंगलुरू, लखनऊ, चेन्नई, देहरादून, हरिद्वार, नैनीताल, हल्द्वानी आणि अलाहाबादसह अन्य प्रमुख शहरांमध्ये शांतता पसरली होती आणि सकाळी रस्ते बंद राहिले. जनता कर्फ्यू आज सकाळी ७ वाजता सुरू झाला आणि रात्री ९ वाजेपर्यंत चालेल.